Home गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने ५ ऑगस्टला जेलभरो आंदोलन,आंदोलनात सहभागी होण्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे...

जिल्हा काँग्रेसच्या वतीने ५ ऑगस्टला जेलभरो आंदोलन,आंदोलनात सहभागी होण्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आव्हान

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0035.jpg

जिल्हा काँग्रेसच्या वतीने ५ ऑगस्टला जेलभरो आंदोलन,आंदोलनात सहभागी होण्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आव्हान

गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शुक्रवार दि,५ ऑगष्टला वाढती महागाई ,बेरोजगारी , जीवनाश्यक वस्तू वरील अधिभार इत्यादी मागण्या च्या संदर्भात जेलभरो आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली आहे,

संपूर्ण देशात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे त्याच प्रमाणे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होणार आहे व वरील समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला केला जाणार आहे.

या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे राज्यात प्रगती ठिकाणी शेती पुर्णत: खरडून गेली आहे, अशी स्थिती निर्माण आहे. आधीच दुबार तीवार पेरणीने जेरीस आलेला शेतकरी एकटा पडला आहे. अशावेळी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे काँग्रेस उभी आहे. नुकतेच मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांनी अतिवृष्टी भागातील जिल्ह्यांचा दौरा करून नुकसान झालेल्या शेतीची प्रत्यक्ष पहाणी केली आहे. तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेवरून राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीपणी समितीने देखील दौरा करून शेतीची पहाणी केली आहे.
मा. प्रांताध्यक्ष महोदय व अतिवृष्टी पहाणी समितीच्या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी तात्काळ सरकारी मदत मिळावी अशी मागणी केली आहे. मात्र राज्यात केवळ दोन मंत्र्यांचे सरकार असल्याने शेतकऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांनी असे निर्देश दिले आहेत की, प्रत्येक जिल्हा व ब्लॉक स्तरावरील उपरोक्त दिवशी होत असलेल्या आंदोलनात खालील मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना देण्यात येणार आहे,
१. ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी ७५ हजार रूपयांची आर्थिक मदत द्यावी.
२. या वर्षाचे पीक कर्ज माफ करावे.
३. फळबागायतदारांना भरीव मदत द्यावी.
४. खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या शेतजमिनीच्या दुरूस्तीसाठी ठोस मदत मिळावी, तसेच आपल्या जिल्ह्यातील शेतक-यांच्या इतरही काही समस्या मांडनार आहेत.
वरील सर्व मागण्या घेऊन शुक्रवार ला होणाऱ्या जेलभरो आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन श्री महेंद्र ब्राह्मणवाडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांनी केलेले आहे पत्रकार परिषदेला उपस्थित नामदेव किरसान ,तुळशीराम पोरेटी ,डॉ नितीन कोडवते ,मंडलवार ,भावना वानखेडे,सतीश विधाते, सगुणा तलंडी,रजनीकांत मोटघरे ,रमेश चौधरी ,संजय चणे,नेताजी गावतुरे, मिलिंद खोब्रागडे ,राकेश रत्नवार,कार्यकर्ता हजर होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here