Home पुणे नदीत बेकायदेशीर भराव व नदी प्रदूषण करणाऱ्या कंपनीला महापालिकेची नोटीस नदी प्रदूषणाबाबत...

नदीत बेकायदेशीर भराव व नदी प्रदूषण करणाऱ्या कंपनीला महापालिकेची नोटीस नदी प्रदूषणाबाबत ” अपना वतन ” संघटनेचा पाठपुरावा

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0014.jpg

नदीत बेकायदेशीर भराव व नदी प्रदूषण करणाऱ्या कंपनीला महापालिकेची नोटीस
नदी प्रदूषणाबाबत ” अपना वतन ” संघटनेचा पाठपुरावा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
काळेवाडी बीआरटी रोड येथील नदीपात्रात बेकायदेशीर भराव टाकल्याबाबत व मैलामिश्रीत सांडपाणी सोडून नदीमधील जीवसृष्टीस व पर्यावरणास हानी पोहचवल्याप्रकरणी मे . खिलारी इन्फ्रा . प्रा . लिमिटेड या कंपनीवर कारवाई करणेबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिकभाई शेख यांनी दि. २८/०७/२०२२ रोजी पिंपरी चिचंवड महापालिका आयुक्त राजेश पाटील , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडे तक्रार केली होती. नदीत टाकलेल्या भरावामुळे नदीचे पात्र अरुंद झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये पुराचा धोका निर्माण होऊ शकतो तसेच नदी मध्ये मैलामिश्रीत व रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे नदीमधील जीवांना धोका निर्माण होऊन ते नष्ठ होण्याचा धोका निर्माण होतो. असे प्रशासनच्या निदर्शनास आणून देंण्यात आले होते. सदर तक्रारीची दखल घेऊन पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी मे खिलारी इन्फ्रा . प्रा . लिमिटेड याना खुलासा करणेबाबत नोटीस काढलेली आहे. तसेच नदीपात्रातील अनधिकृत बंधकांबाबत ग प्रभाग कार्यालयास कळविले आहे. मे खिलारी इन्फ्रा . प्रा . लिमिटेड याना दिलेल्या नोटीसमध्ये असे नमूद केले आहे कि, पावसाळ्यापूर्वी नदीतील भराव काढून टाकण्याच्या सूचना वारंवार केल्या होत्या तरी आपण कोणतीही कार्यवाही केलेली नाही . सदरची बाब हि अतिशय गंभीर असून आपल्यावर निविदा अटी व शर्तीनुसार कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा ४ दिवसात करण्यात यावा .सदरचा खुलासा वेळेत सादर न केल्यास किंवा दिलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास आपल्यावर निविदा अटी व शर्ती नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल . तसेच सदरचा भराव काढणेबाबत आपल्याकडून कार्यवाही करण्यात यावी व कामाचा अहवाल या विभागास सादर करण्यात यावा .अशा प्रकारची नोटीस देण्यात आलेली आहे.

Previous articleपांगरा येथे पडली घरावर विज,बालंबाल टळली जिवितहानी!
Next articleजिल्हा काँग्रेसच्या वतीने ५ ऑगस्टला जेलभरो आंदोलन,आंदोलनात सहभागी होण्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आव्हान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here