• Home
  • देवळा तालुक्यातील मेशी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह.

देवळा तालुक्यातील मेशी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह.

देवळा तालुक्यात मेशीत एका महिलेचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
देवळा:-देवळा तालुक्यातील मेशी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मूळ टेम्भे ता. बागलाण येथील रहिवाशी असलेली ( मुंबईस्थित)व वासोळपाडे(फुलेनगर) ता देवळा येथील माहेर असलेली महिलेचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने व त्या महिलेचा १८ तारखेला नाशिक येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.त्यामुळे आजपर्यंत सुस्थितीत असलेल्या देवळा तालुक्यात कोरोना संसर्गाचा शिरकाव होतो की काय आणि तालुक्यात आतापर्यंत प्रशासनाने आणि नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केलेल्या उपाययोजनांवर पाणी फिरते की काय अशी शक्यता यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
सदर प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता तालुका प्रशासन योग्य त्या उपाययोजनांसाठी सज्य झाले असून आज गुरुवार दि.२१ ते रविवार दि.२४ सायंकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी घेतला असल्याची माहिती सरपंच सुनंदा अहिरे,उपसरपंच भिका बोरसे,आणि ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे

anews Banner

Leave A Comment