Home कोरोना ब्रेकिंग कोरोनाचे संकट ! मुंबईतून येणाऱ्यांसाठी अशी केली जातेय व्‍यवस्‍था !

कोरोनाचे संकट ! मुंबईतून येणाऱ्यांसाठी अशी केली जातेय व्‍यवस्‍था !

119
0

⭕ कोरोनाचे संकट ! मुंबईतून येणाऱ्यांसाठी अशी केली जातेय व्‍यवस्‍था ! ⭕
रायगड : ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

गावाबा‍हेर ठोकले तंबू
अनेक लोक कोरोनाच्या धास्तीमुळे आपल्या गावाकडे परत आहेत. मात्र, अनेकांनी परतीचा मार्ग पत्करला तरी कोरोनाचे संकट कायम आहे. आता गावातही कोरोना शिरल्याने गावकरीही सर्तक झाले आहेत. काही ठिकाणी लोकांना गावात प्रवेश दिला जात नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे गावी परतणाऱ्यांचे हाल होत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात एका गावाने नवा आदर्श ठेवला आहे. नाईक कुणेतील ग्रामस्‍थ मुंबईकर आणि चाकरमान्‍यांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज आहेत. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि येणाऱ्या गावकऱ्यांना त्रास होऊ नये, म्हणून काळजी घेताना दिसत आहेत. त्यांनी गावाच्या वेशीवर तंबू ठोकून निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. या गावकऱ्यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या भीतीने नातीगोती विसरली जात आहेत. शेजारधर्म तुटला जात आहे. बहुतांशी ठिकाणी मुंबई वरुन येणा-या चाकरमान्यांना गावात घेण्यास विरोध केला जात आहे. परंतु हळूहहू ग्रामस्‍थांची मानसिकता बदलते आहे . अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत अंतर्गत नाईक-कुणे ग्रामस्थांनी मुंबईकर चाकरमान्‍यांच्‍या स्‍वागताची तयारी केली आहे.  ग्रामस्‍थांनी अंगमेहनतीने सर्वसुविधांसह तात्‍पुरते क्‍वारंटाईन सेंटर उभारले आहे.

खानावच्या सरपंच अनिता गोंधळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकऱ्यांसह कोरोनाने भयभीत झालेल्या आपल्या गावातील मुंबईकरांना आधार देण्यासाठी ग्रामस्थांची बैठक घेतली .यात आपल्या गावातील मुंबईत राहणाऱ्या कोरोनाने भयभीत झालेल्या गाववाल्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना धीर देण्याची गरज आहे. त्यांना या भीतीतून बाहेर काढण्यासाठी गावाशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे सर्वांचे एकमत होवून मुंबईकर ग्रामस्थांना गावात प्रवेश देण्यावर सर्व ठाम झाले आणि त्यातून त्यांच्या राहण्यासाठी तंबू ठोकण्याची संकल्पना मांडली गेली.

गावापासून दूर शेतजमिनीत सर्व ग्रामस्थांनी अंगमेहनतीने शेतजमीनीत कापडी मंडप तयार केले आहेत. पाण्यासह न्‍हाणीघर , शौचालयाचीही तात्पुरती व्यवस्था केली आहे.  स्‍वयंपाकासाठी सर्व साहित्‍य उपलब्‍ध करुन दिले आहे . ग्रामस्थांनी या कामामध्ये स्वतःला झोकून देवून काम केले आहे.  या सुविधेमुळे कोरोनाने हवालदिल झालेल्या मुंबई करांना चांगलाच आधार मिळणार  आहे. एकीकडे चाकरमान्यांच्या व्यवस्थेवरुन वाद निर्माण होत असताना अलिबाग तालुक्यातील नाईक कुणे येथील ग्रामस्थांनी कोरोनाग्रस्त ग्रामस्थांसाठी दाखविलेले औदार्य बिथरलेल्या चाकरमान्यांसाठी आशादायी ठरत आहे.

Previous articleदेवळा तालुक्यातील मेशी येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह.
Next articleदीड महिन्यांच्या बाळाचा वाचवण्यासाठी डॉक्टरनं स्वत:चा जीव घातला धोक्यात !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here