Home बुलढाणा अपडाऊन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कोण लावणार रोख? शासनाच्या आदेशाला तालुक्यात...

अपडाऊन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कोण लावणार रोख? शासनाच्या आदेशाला तालुक्यात सरकारी कार्यलाय मध्ये अंमलबजावणी नाही?

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220717-WA0023.jpg

अपडाऊन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कोण लावणार रोख?
शासनाच्या आदेशाला तालुक्यात सरकारी कार्यलाय मध्ये अंमलबजावणी नाही?

ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख सह
विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील
संग्रामपुर –
तालुक्यातील अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे . तालुक्यातील तहसील कार्यलाय, पंचायत समिती, ग्रामपंचायत ,तलाठी कार्यलाय, शिक्षक वर्ग,आरोग्य सेवक,महावितरण अधिकारी, वायरमन हे मुख्यलयीन राहत नाहीत.

ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक,महावितरण अभियंता,वायरमन, यांनी राज्य सरकार ,जिल्हाधिकारी ,मुख्याधिकारी जिल्हा परिषद आदेश धाब्यावर बसवला. अद्यापही ते मुख्यालय वास्तव्याला नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्या मुख्यालयी रहावे जेणेकरून नागरिकांना योग्य ती माहिती उपलब्ध होऊ शकेल. तालुक्याच्या स्तरावर चक्कर होऊ नये, तहसील, पंचायत समिती मुख्यालयी राहून शेतकऱ्यांना नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करावे तहसील कार्यालय मधील कर्मचारी, अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक,महावितरण अधिकारी ,वायरमन अद्यापही मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये, नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
शासकीय कर्मचारी करतात दररोज अपडाऊन, कामे रखडली

ग्रामिण भागा मध्ये कार्यालयात काम करणारे असंख्य कर्मचारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत अपडाउन करत आहेत. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडल्याचा प्रकार समोर आला आहे. गावात कोणत्याच विभागातील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामस्थांना ग्रामपंचायत तलाठी कार्यालय जिल्हा परिषद शाळा विद्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी विभागात जाताना तासंतास कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते.कर्मचारीवर्ग वेळेवर येत नसल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य केंद्रात रात्री वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्यामुळे आरोग्य केंद्र व रुग्णवाहिनी असून सुद्धा नागरिकांना खासगी दवाखान्यात व खाजगी वाहनातून उपचारासाठी अकोला येथे जावे लागते. त्यामुळे या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दाखल्यावरच मिळतो घरभाडे भत्ता ग्रामीण भागात मुख्यालयी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरपंच, पोलिस पाटील यांच्यामुळे मुख्यालयी राहण्याचा दाखला मिळतो. सदर दाखला हा घरभाडे मिळवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. दाखला मिळाल्यानंतर कर्मचारी अपडाऊन करण्यास मोकळे असल्याचे दिसून येत आहे.
घरभाडे घेणारे यांची चौकशी व्हावी……………………
“ज्या ठिकाणी नेमणूक आहे तिथं काम करण्यासाठी मुख्यलयीन राहण्याचा आदेश आहे.मात्र नावाला घर भाडे दाखवून त्याची उचल केली जाते.तर प्रत्यक्षात अधिकारी किंवा कर्मचारी हे दुसऱ्या ठिकाणी वरून अपडाऊन करतात. त्यामुळे भाड्याने राहत असल्याचे सांगून घरभाडे घेणारे यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तालुक्यातील नागरिक याच्या कडून होत आहे.

Previous articleसिलेंडरचे नवीन दर जाहीर
Next articleजागतिक युवा कौशल्य दिन” दिनानिमित्त प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here