Home Breaking News *देगलूर तालुक्यातील मौजे कोटेकल्लुर येथे गॅस सिलेंडर चा स्फोट होऊन दोन घरांना...

*देगलूर तालुक्यातील मौजे कोटेकल्लुर येथे गॅस सिलेंडर चा स्फोट होऊन दोन घरांना लागली आग*

131
0

*देगलूर तालुक्यातील मौजे कोटेकल्लुर येथे गॅस सिलेंडर चा स्फोट होऊन दोन घरांना लागली आग*

मुखेड,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)- देगलूर तालुक्यातील मौजे कोटेकल्लुर येथील अर्चना महादेव बोयावार यांच्या राहत्या घरी स्वयंपाकाच्या गॅसचा अचानक स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन घरांना आग लागली.त्यामध्ये अंदाजे एक ते दीड लाखाचा नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. देगलूर परिषदेच्या अग्निशामक दलाने सायंकाळी ही आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मौजे कोटेकल्लुर तालुका देगलूर येथील रहिवासी असलेल्या अर्चना महादेव बोयावार ही महिला शुक्रवारी सायंकाळी स्वयंपाक करीत असताना अचानकपणे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. यामध्ये घरगुती साहित्य टीव्ही कुलर पंखा व इतर संसार उपयोगी धान्य डाळी ज्वारी गहू तांदूळ कपडे शिलाई मशीन व कपाट असे एक ते दीड लाख रुपयांचे साहित्य आगीत जळून भस्मसात झाले. या आगीने शेजारील असलेल्या गणपत लालू बोया वार यांच्याही घराला जवळ केले त्यामध्ये त्यांच्या घरातील ५०ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे पीडित कुटुंबास मौजे शहापूर येथील कार्यकर्ते विलास यालावार यांनी राहण्याची व जेवणाची सोय करून दिली. या पीडित कुटुंबास प्रशासनामार्फत तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. रात्री बऱ्याच उशिरा पर्यंत प्रशासनाने यासंदर्भात पंचनामा केलेला नव्हता ऐन दिवाळीच्या तोंडावर ही दुर्घटना घडल्या मुळे गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Previous article*गरबड येथे राघोजी बिरसा संयुक्त जयंती उत्सव*
Next article*जाहूर ते खानापूर रस्त्याची अत्यंत दुर्दशा*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here