• Home
  • *गरबड येथे राघोजी बिरसा संयुक्त जयंती उत्सव*

*गरबड येथे राघोजी बिरसा संयुक्त जयंती उत्सव*

*गरबड येथे राघोजी बिरसा संयुक्त जयंती उत्सव* मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)– मालेगाव तालुक्यातील गरबड गावात आज बिरसा मुंडा यांची १४५वी जयंती व राघोजी भांगरे यांची ८नोव्हेंबर २१५वी जयंती उत्सव आदिवासी विचार मंच,एकलव्य संघटना व बिरसा ब्रिगेड संघटना गरबड यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मा. ग्रामपंचायत सदस्य संजय भांगरे हे अध्यक्षस्थानी होते.धरती आबा भगवान बिरसा मुंडा,वीर एकलव्य व आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.आदिवासी विचार मंच अध्यक्ष गोरख नाडेकर यांनी प्रास्ताविक सादर केले.आदिवासी नायक बिरसा मुंडा यांच्या सामाजिक क्रांती व उलगुलान याबद्दल शिवाजी सबगर यांनी माहिती देऊन अभिवादन केले. मधु गुमाडे यांनी बिरसा मुंडा प्रश्नमंजुषा कार्यक्रम सादर केला. जितेंद्र रगतवान यांनी पथनाट्य सादर केले. नितीन गुमाडे यांनी स्वरचित पोवाडा,शौर्यगीत राघोजी भांगरे यांच्यावर सादर केले.बजरंग गुमाडे यांनी लहान मुलांना महापुरुषांची वेशभूषा करून दिली.आदिवासी चळवळीचे नेतृत्व रमेश जाधव यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने राघोजी भांगरे यांचे चरित्राचे वर्णन केले.शांताराम दळवी यांनी एकलव्य चळवळीबद्द्ल आढावा सादर केला.यावेळी अरुण भांगरे,भावसिंग गुमाडे,शंकर जाधव,विष्णू गुमाडे,अनिल नाडेकर,वसंत भांगरे,नामदेव घोडे,गोरख भांगरे,अशोक गुमाडे,आण्णा भांगरे,आप्पा सबगर,संजय भांगरे,पांडुरंग गुमाडे,नागेश गुमाडे, दादाजी बगाड,गोविंदा गुमाडे,सुनील सबगर,बबलू जाधव हे कार्यकर्ते उपस्थित होते.सूत्रसंचालन हरी नाडेकर यांनी केले तर शरद गुमाडे यांनी आभार मानले.

anews Banner

Leave A Comment