Home नांदेड महाशिवराञी निम्मित अंखड हरिनाम सप्ताहास आजपासुन सुरवात.

महाशिवराञी निम्मित अंखड हरिनाम सप्ताहास आजपासुन सुरवात.

204

राजेंद्र पाटील राऊत

महाशिवराञी निम्मित अंखड हरिनाम सप्ताहास आजपासुन सुरवात.
नांदेड/ मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज
मुखेड तालुक्यातील जाहुर येथे महाशिवराञीनिम्मित अंखड हरिनाम सप्ताह दि.23 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान आयोजीत करण्यात आलेला आहे.पहाटे 4 ते6 काकडा आरती,सकाळी 8ते 10 शिवलीलाअमृत पारायण  ,सकाळी 11 ते 1 गाथाभजन दुपारी 3 ते 6 रामायण,सांयकाळी 6 ते 7 हरीपाठ,राञी 9 ते 11किर्तन  राञी 11ते 4 हरीजागर होणार आहे.

दि.23 फेब्रुवारी रोजी श्री.ह.भ.प.गंगाधर महाराज वसुरकर,24 फेब्रुवारी रोजी श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कोळेकर,25 फेब्रुवारी रोजी श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज काकडे,26 फेब्रुवारी रोजी श्री.ह.भ.प.माऊली महाराज जाहुरकर (बालकिर्तनकार  ),27 फेब्रुवारी रोजी श्री.ह.भ.प.कालीदास महाराज पाळेकर,28 फेब्रुवारी रोजी भगवान महाराज महालिंगीकर,1 मार्च रोजी  श्री.ह.भ.प. मनोहर महाराज आंळदीकर, यांचे किर्तन होणार आहे. 1मार्च रोजी राञी अग्निकुंड होईल. 2 मार्च रोजी मनोहर महाराज वसुरकर  यांचे काल्याचे किर्तन सकाळी 10 ते  12 या वेळेत होणार आहे व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे दुपारी 3 वाजता जंगी कुस्त्यांचा सामना होणार आहे.या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleकंटेनर उलटल्याने वाहतुक विस्कळीत
Next articleकाळ्या फिती लावून निषेध नोंदवा ! माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.