Home विदर्भ काळ्या फिती लावून निषेध नोंदवा ! माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना...

काळ्या फिती लावून निषेध नोंदवा ! माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे आवाहन

199
0

राजेंद्र पाटील राऊत

काळ्या फिती लावून निषेध नोंदवा !
माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे आवाहन
वाशिम, (गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज): राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने त्यांच्या विविध मागण्यांच्या
पूर्ततेसाठी २३ व २४ फेब्रुवारी रोजी
राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपाला वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने
आपंला पाठिंबा जाहिर केला असून समस्यांच्या निवारणार्थ जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून कामकाज करीत निषेध आंदोलन करावे असे आवाहन करण्यात आले आहे
यासंदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठविले असून, त्यामध्ये
शिक्षक – शिक्षकेतर कर्मचार्‍यांना लागू
केलेली नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करणे, अनुदानास पात्र ठरलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील शिक्षक-कर्मचार्‍यांच्या
वेतन अनुदानावर पुढील टप्पे नियमित
मंजूर करणे, निकषपात्र न ठरलेल्या
शाळांबाबत अनुदानावर निकष
शिथिल करणे व अनुदान देणे,माध्यमिक शाळा शिक्षकांना वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे तात्काळ :
नियोजन करणे, देय असलेले वेतनेतर अनुदान थकबांकीसह अदा करणे,
राज्य कर्मचार्‍यांप्रमाणे शिक्षक – :
शिक्षकेतर कर्मचार्‍यांना १०, २०, ३०
वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू
करणे, या व इतर अनेक मागण्या व
समस्या नमूद केल्या आहेत. तसेच आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी चालढकल करणाऱ्या मुर्दाड शासनव्यवस्थेचा निषेध नोंदविण्याची व राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या संपाला समर्थन दर्शविण्यासाठी दि. २२ व २३ फेब्रुवारी रोजी सर्व शिक्षक शिक्षकेतर काळ्या फिती लावून कामकाज करतील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवावा असे आवाहन वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीशी संलग्न असलेल्या पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, विज्यूक्टा संघटना, उर्दू टीचर्स असोसिएशन,उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, अमरावती विभागीय शिक्षक संघ, शिक्षक संघर्ष संघटना या घटक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleमहाशिवराञी निम्मित अंखड हरिनाम सप्ताहास आजपासुन सुरवात.
Next articleपेठवडगाव मध्ये मुस्लीम समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here