Home बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे युवासेना तालुका च्या वतीने भव्य...

खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे युवासेना तालुका च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न.!

81
0

आशाताई बच्छाव

IMG_20231201_043726.jpg

खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे युवासेना तालुका च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न.!

ब्युरो चीफ बुलढाणा (ज्ञानेश्वर पाटील दांदळे) बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेना (शिंदे गटाच्या) वतीने करण्यात आले आहे.आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सईबाई मोटे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे युवा सेना (शिंदे गट) शेगाव तालुक्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सईबाई मोटे रुग्णालय येथील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व संचलन युवा सेना तालुकाप्रमुख उमेश पाटील शेळके यांनी केले असून
या रक्तदान शिबिरामध्ये रामदास संपाळे, इश्वर सागोळे, उमेश जाधव, ज्ञानेश्वर वखारे, शंतनु पुंडकर, ध्रुव नेमाडे,
पवन मनोहर, राजकुमार कुंजन सिंग,मिलिंद डोगरे, संतोष कराळे,अजय कोकाटे, शकर सिंह ठाकुर. या युवकांनी रक्तदान केले.
यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांचेसह उपजिल्हाप्रमुख युवा सेना मंगेश गायके, उपजिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना अजय कोकाटे, शिवसेना तालुका प्रमुख रामेश्वर थारकर, किसान सेना तालुकाप्रमुख अजय अहिर, युवा सेना तालुकाप्रमुख उमेश पाटील शेळके, युवा सेना तालुका संघटक शांतनु पाटील, सरपंच योगेश पीसे, सरपंच सदू पाटील, उपतालुकाप्रमुख अमोल मुंडाले, उप तालुकाप्रमुख अनिल फाळके, ज्ञानेश्वर हिंगणे, अक्षय बोर्डे, आकाश माकोडे, अक्षय भांगे, गजानन बावने, विजय सरदार शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here