Home नांदेड राज्यस्तरीय कायाकल्प,जिल्हा गुणवत्ता आश्वासन पर्वेशक पथकांची (LAQSH, ENQS) ग्रामीण रुग्णालय कंधार येथे...

राज्यस्तरीय कायाकल्प,जिल्हा गुणवत्ता आश्वासन पर्वेशक पथकांची (LAQSH, ENQS) ग्रामीण रुग्णालय कंधार येथे भेट.

124

आशाताई बच्छाव

IMG-20221020-WA0170.jpg

राज्यस्तरीय कायाकल्प,जिल्हा गुणवत्ता आश्वासन पर्वेशक पथकांची (LAQSH, ENQS) ग्रामीण रुग्णालय कंधार येथे भेट.

पथकाकडून सर्व कामाबद्दल शाबासकीची थाप.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)

दि 17 रोजी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. आर. लोणीकर सर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कायाकल्प पथकाकडून ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यात आली.

या राज्यस्तरीय कायाकल्प पथकांचे मुख्य अधिकारी डॉ. बापू निकाळजे साहेब जिल्हा गुणवत्ता आश्वासन सुपरवायझर बीड , डॉ.राम आव्हाड साहेब निवासी वैद्यकीय अधिकारी बीड आणि डॉ.अर्चना तिवारी कायाकल्प जिल्हा प्रतिनिधी. या सर्व अधिकाऱ्यांनी (पथक) ग्रामीण रुग्णालयाची पाहाणी केली असता यात प्रामुख्याने कमी मनुष्यबळ असतानाही डॉ लोणीकर यांनी सर्व बाबीकडे लक्ष्य दिल्यामुळे व संस्था विकसीत केल्यामुळे वरीष्ठ अधिकारी यांनी डॉ लोणीकर साहेबांचे विशेष कौतुक केले.

सर्व विभाग निहाय रेकॉड चेक करून कौतुक केले.

वॉर्ड , हॉस्पिटल , आसपासचा परिसर, प्रसूती , ऐकलंमसियावॉर्ड, दंत शल्यचिकित्सक विभाग ,आय सी टी सी विभाग, प्रसुतीपश्चात वार्ड, एक्स-रे विभाग, पुरुष जनरल वार्ड , अपघात विभाग, निवासी डॉक्टर विभाग ,RBSK विभाग, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया विभाग ,स्त्रक्रिया गृह, पाकगृह,RKSK विभाग,NCD विभाग, आयुष वैद्यकीय अधिकारी विभाग , बालक लसीकरण विभाग, नोंदणी विभाग, प्रयोगशाळा विभाग, कोविड लसीकरण विभाग ,या सर्व विभागातील स्वच्छता तसेच रेकॉर्ड मेंटनस पाहून समाधान व्यक्त करत कौतुक केले.
ग्रामीण रुग्णालयाचे दंत शल्यचिकित्सक डॉ.महेश पोकले सर, यांनी प्रास्तविक केले .उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleत्यांच्या नजरेतील आकाश कंदील शोधू यात – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
Next articleअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या निधी बाबतआझाद ग्रुप फाउंडेशन च्या वतीने तहसीलदाराना निवेदन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.