• Home
  • *नाशिकचे शासकीय विश्रामगृह बनले धर्मशाळा;आज पार पडले आंदोलन*

*नाशिकचे शासकीय विश्रामगृह बनले धर्मशाळा;आज पार पडले आंदोलन*

*नाशिकचे शासकीय विश्रामगृह बनले धर्मशाळा;आज पार पडले आंदोलन*
*नाशिक,(विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-
*छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक येथे शासकीय विश्रामगृह बचाव आंदोलन करण्यात आले होते. कार्यकारी अभियंता सिद्धात तांबे व उपविभागीय अभियंता छगन सोनवणे यांच्या हलगर्जी व कामचुकार पणा मूळ नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात अवैध प्रवासी व धंदे सुरू आहेत… यांचा शोचे, पांडे व लोंढे वर वचक नाही…यांचा अगोदर पण 18/08/2020 रोजी निवेदन देण्यात आले होते, तरी कोणतीही कारवाई यांनी केली नाही, त्याचा करता छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे शासकीय विश्रामगृह बचाव आंदोलन करण्यात आले आहे. नाशिक सरकारी गेस्ट हाऊस( विश्रामगृह) हे आता अवैध धंदा साठी सार्वजनिक धर्मशाळा झाली आहे…*

*नाशिक सार्वजनीक बांधकाम विभागात शासकिय विश्रामगृह नोंदणी करण्यासाठी काही बनावटी पत्रकार ( अनाधिकृत ओळखपत्र दाखवत ) विश्रामगृहातील सुट आरक्षीत करतात जे आरक्षण करणारे (लिपीक) आहेत. त्यांच्या कडे कायदेशीर पत्र येते त्या पत्राच्या अनुषंगाने तेथुन संबंधीत व्यक्तीच्या नावाने शासकिय परवान्यात रूम नंबर , बिल्डींग नाव टाकुन तसा लेखी परवाना विश्रामगृहात दिला जातो विश्रामगृहातील कर्मचारी मंडळींना संबंधीत व्यक्तीच्या नावे परवाना आलेला आहे. म्हणुन कुठलाही विचार न करता लगेच त्यांना ताबडतोप परवान्यात नोंद असलेला कक्ष संबंधिताला द्यावा लागतो ही शासकीय कार्य पद्धती सगळ्यांनसाठी ( पत्रकारीतेत अधिस्विकृत पत्रकारांसाठीच ) लागु आहे. परंतु काही नाशिकातील कागदोपत्री बनावट लबाड लांडग्या पञकारांचे नाशिकात घर असते / फ्लॅट असतो तरीही ते शराब व शवाब साठी विश्रामगृहातील कक्ष आरक्षीत करतात व तेथे सगळे मनमुरादपणे धंदे करतात…*

*नाशिक शासकीय विश्रामगृहात ANX च्या रूम मध्ये काही बनावट पत्रकारांच्या नावे तेथे रूम बुक करून सर्रास पने बिअर, दारू , सिगारेट ओढता आणि चिकन तंदुरी / फिश फ्राय / हिरवे वाटाणे असे चखणा खाऊन मौज मस्ती करणारे काही बोगस पत्रकार आहेत. त्यातच ते स्वतःला RTI चे अतीअभ्यासु तथा बनावटी बुद्धीमान कार्यकर्ता म्हणवुन घेणाऱ्या बिन बुडाचे लोट्यांना आपण आपल्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये स्थान देऊ नये.. बोगस, खोट्या व तोडीपाणी व सेटलमेंट करणारे लोकांना शासकीय विश्राम गृह येथे प्रवेश प्रक्रिया मिळवून देणारे शौचे, पांडे व लोंढे यांना तात्काळ पदावरून हटवा अशी छावा जनक्रांती संघटना ची मागणी आहे.*

*शासकीय विश्रामगृह रूम मध्ये 1) बोगस व स्वयंम घोषित माहितीचा अधिकार कार्यकर्ते. 2) बोगस व स्वयंम घोषित पत्रकार व संपादक. 3) बोगस व स्वयंम घोषित संघटना 4) बोगस व स्वयंम घोषित वारकरी संघटना. इत्यादी विविध लोकांना शासकीय विश्रामगृह येथे VIP रूम देण्यासाठी शौचे, पांडे, लोंढे हेच कारणीभूत आहेत.पण यांच्यावर नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग चे कार्यकारी अभियंता सिद्धांत तांबे व उपविभागीय अभियंता छगन सोनवणे यांचा मुख्य हात आहे. क्रारण भ्रष्टाचार होतोय, जनतेसमोर नको यायला पाहिजे हेच मुख्य कारण आहे..*

*नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग चे कार्यकारी अभियंता सिद्धांत तांबे व उपविभागीय अभियंता छगन सोनवणे यांनी शासकीय विश्राम गृह संदर्भात सर्व खोटे व जुने पुरावा छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र ला सादर केले आहेत…स्वच्छता नाही, सुरक्षा रक्षक नाही, लोक येतात व जातात यांची नोंद नाही, साफसफाई नाही, एक एक महिना रूम साफ करत नाही, कोरोना ची फवारणी नाही, फर्स्ट लूक देखावा सादर करण्यात येतो, पण सत्य काही नाही आहे, साफसफाई व स्वच्छता कंपनी लवकरात लवकर नाशिक शासकीय विश्रामगृह येथे बंद करण्यात आली पाहिजे. खूप घाणी थैमान घातले आहे…कोरोना ची फवारणी नही, संडास व बाथरूम मध्ये स्वच्छता नाही, दारू पिऊन धिंगाणा घातला जातो, घाणीचे साम्राज्य निर्माण करून शासकीय विश्राम गृह येथे खूप काही मोठे मोठे कांड चालतात. साफ सफाई ची एन्जशी वर तात्काळ कारवाई करून बंद करून, लवकर ब्लॉक लिस्ट मध्ये स्वच्छता कंपनी टाकावी..*

*छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे आज नाशिक येथे आंदोलन करण्यात आले आहे. नाशिक शासकीय विश्रामगृह विषयाकडे नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे व उपविभागीय अभियंता छगन सोनवणे यांनी विशेष लक्ष वेधून काम करायचे आहे…पुन्हा असंच चालू असेल तर छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे यांचा वर शासकीय नियम प्रमाणे गुन्हा दाखल करणार आहे. काही दळभद्री बोगस व खोटे पत्रकार व बोगस माहितीचा अधिकार कायदा चा गैरवापर करणारे भुरटेचोर (तोडीपाणी करणारे माहितीचा अधिकार कार्यकर्ते) बोगस संघटना व तोडीपाणी करणारे संघटना व खोट्या वारकरी संघटना यांना नाशिक विश्रामगृह येथे कायमची बंदी घालण्यात जर आली नाही. तर छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता ( सा. बां विभाग, नाशिक) यांचावर कायदेशीर तरतूद चा विचार करून गुन्हा दाखल करण्यात येणार.*

*छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे आज सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक येथे विश्रामगृह बचाव आंदोलन करण्यात आले.याचाप्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे नाशिक जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्रीकांत पेखडे, छावा जनक्रांती संघटना नाशिक ग्रामीणचे संपर्कप्रमुख सुभाष जाधव, नाशिक जिल्हाअध्यक्ष वैभव गवाल, छावा जनक्रांती संघटना नाशिक महिला आघाडीचे ग्रामीण अध्यक्षा हर्षदाताई चौधरी, छावा जनक्रांती संघटना महिला आघाडी चे नाशिक जिल्हा अध्यक्षा निलोफर शेख, छावा जनक्रांती संघटना मीडिया प्रमुख प्रा. निलेश दूसे, नाशिक शहरअध्यक्ष किसन त्रिभुवन व नाशिक शहर महिला आघाडी अध्यक्षा तस्मिम शेख, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे महासचिव व कायदेशीर सल्लागार ADV. अलका शेळके मोरे पाटील, महिला आघाडी चे पदाधिकारी जैनाब शेख व आयशा शेख, छावा जनक्रांती संघटना चे नाशिक येथील पदाधिकारी रतन शिंगाडे, महादेव केनी, गोरख नेटके, निलेश वाघमारे, विशाल लोंढे, हरीश अस्वरे, गणेश देवरे अंकुश पगारे, विशाल सूर्यवंशी, शुभम मुंढे, छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.*

anews Banner

Leave A Comment