• Home
  • *युवा मराठा न्युजचे राजेश भांगे यांना पितृशोक*

*युवा मराठा न्युजचे राजेश भांगे यांना पितृशोक*

*युवा मराठा न्युजचे राजेश भांगे यांना पितृशोक*
*नांदेड,( संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* युवा मराठा न्युज चँनलचे नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी राजेश भांगे यांचे वडील नारायणराव रघुनाथराव भांगे यांचे काल गुरुवारी सकाळी साडेसात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
मृत्यूसमयी नारायणराव भांगे यांचे वय ७६ वर्ष इतके होते.देगलूर शहरातील एक प्रतिष्ठित व शांतप्रिय नागरिक म्हणून त्यांचा नावलौकिक होता,त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले, सुना व एक नातू तीन नाती असा परिवार आहे.भांगे कुटूंबियांवर कोसळलेल्या दुःखात युवा मराठा न्युज परिवार महाराष्ट्र सहभागी असून,ईश्वर मृत नारायणराव भांगे यांच्या मृतात्म्यांस चिरशांती देवो हिच भावपूर्ण श्रध्दांजली.
श्रीमती आशाताई बच्छाव
व्यवस्थापकीय संपादक
युवा मराठा न्युज चँनल महाराष्ट्र

anews Banner

Leave A Comment