Home Breaking News *चेन्नई सुपर किंग संघातील १२जनाना कोरोनाची लागण*

*चेन्नई सुपर किंग संघातील १२जनाना कोरोनाची लागण*

104
0

*चेन्नई सुपर किंग संघातील १२जनाना कोरोनाची लागण*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. इंडिया टुटेने ही बातमी दिली आहे. करोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात हलवलं आहे. बीसीसीआयने युएईत दाखल झाल्यानंतर सर्व संघांना मार्गदर्शक तत्व आखून दिली होती. चेन्नईचा संघही या सर्व नियमांचं पालन करत होता. अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीयेत.
दुबईत दाखल झालेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी नियमाप्रमाणे आपला ६ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे
परंतू संघातील सदस्यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे चेन्नईच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केलेली नाही. राजस्थान, पंजाब यासारख्या संघांनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत दाखल झाल्या-झाल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची करोचा चाचणी करण्यात आली होती. मात्र संघातील सपोर्ट स्टाफमधले १२ सदस्य आणि एका खेळाडूला करोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला आहे.
१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली होती. “युरोपात फुटबॉल लिग स्पर्धा सुरु झाली तेव्हा सुरुवातीच्या क्षणांत काही खेळाडू करोना पॉझिटीव्ह आढळले होते. ८ संघ खेळाडू आणि इतर स्टाफ मिळून १ हजारापेक्षा जास्त लोकं भारतातून युएईत आली आहेत. कोणत्याही संघासोबत हा प्रकार घडणं अत्यंत स्वभाविक आहे. सर्व खबरदारी घेतल्यानंतरही चेन्नईतील खेळाडू व इतर सदस्यांना अहवाल पॉझिटीव्ह येणं हे दुर्दैवी आहे. परंतू परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही यासाठी सर्वतोपरीने काळती घेतली जात आहे.” सुत्रांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.

Previous article*युवा मराठा न्युजचे राजेश भांगे यांना पितृशोक*
Next article*तुकाराम मुंढे यांची बदली होताच नागपुरात फरक*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here