Home Breaking News 🛑 ‘रेल्वे’पिडिया आता ऑनलाईन मोडमध्ये आता घरबसल्या 🛑

🛑 ‘रेल्वे’पिडिया आता ऑनलाईन मोडमध्ये आता घरबसल्या 🛑

85
0

🛑 ‘रेल्वे’पिडिया आता ऑनलाईन मोडमध्ये
आता घरबसल्या 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 23 जुलै : ⭕ गेल्या साडेतीन महिन्यापासून कोरोनामुळे रेल्वे प्रवासी वाहतूक ठप्प आहेत. मात्र रेल्वेचे नवनवीन उपक्रम थांबले नाहीत. रेल्वेने लॉकडाऊनच्या काळात कोरोनाशी दोन हात करण्याकरिता मध्य रेल्वेने रोबोटची निर्मिती तर सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरक्षेसाठी अनेक उपयोजना केल्या आहेत. मात्र मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एक नवीन उपक्रम सुरू करत रेल्वे कर्मचारी आणि सामान्य नागरिकांच्या ज्ञानात भर घालण्याकरिता एक वेबसाईट विकसित केली आहे. ज्यात अभ्यासाचे साहित्य, व्हिडिओ, परिपत्रके, कोड्स , मॅन्युअल, अहवाल, प्रश्न बँक, प्रबंध इत्यादी संदर्भासाठी अपलोड केले जात आहे. सुमारे ५४० पुस्तके, अभ्यासाचे साहित्य आणि सुमारे १०० व्हिडिओ, महत्त्वाच्या वेबसाईट लिंक अपलोड केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांना घरी बसून रेल्वे संदर्भात मनसोक्त अभ्यास करता येणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात शाळा, महाविद्यालय बंद आहेत. तसेच खासगी आणि सरकारी खात्यातील ग्रंथालय सुध्दा बंद आहेत. त्यामुळे अनेकांचा अभ्यास थांबला आहे. मात्र भारतीय रेल्वेने आपल्या कर्मचार्‍यांसाठी आणि रेल्वे प्रेमी नागरिकांसाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. मध्य रेल्वे पुणे विभाग यांनी एक वेबसाईट विकसित केली आहे. ज्यात अभ्यासाचे साहित्य, व्हिडिओ, परिपत्रके, कोड्स , मॅन्युअल, अहवाल, प्रश्न बँक, प्रबंध इत्यादी संदर्भासाठी अपलोड केले जात आहेत. सुमारे ५४० पुस्तके, अभ्यासाचे साहित्य आणि सुमारे १०० व्हिडिओ, महत्त्वाचे वेबसाइट लिंक अपलोड केले गेले आहेत आणि मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (ह्युमन रिसोर्स मनेजमेंट सिस्टम) लिंक प्रदान केल्या आहेत. जेथे पुणे विभागाचे मानव संसाधन (एचआर) डिजीटलायझेशन उपलब्ध आहे. येथे ऑनलाईन प्रशिक्षण लिंक्स देण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही ऑनलाइन व्याख्याने देऊ शकेल आणि प्रत्येकास ते पाहता येईल. कार्मिक शाखेच्या कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या टिममुळे हे शक्य झाले आहे. जे या प्रयत्नात निरंतर मदत करीत आहेत. वेबसाईटची लिंक WWW.IROT.IM ही आहे.

विद्यार्थ्यांना होणार फायदा रेल्वे परिक्षाची तयारी करणार्‍या विद्यार्थांना या वेबसाईटच्या मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कारण रेल्वेचे अनेक अहवाल या वेबसाईटवर देण्यात आले आहे. तसेच रेल्वे संबंधीत माहिती संंबंधीत तंज्ञाचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. यापूर्वी विद्यार्थ्यांना रेल्वेच्या अभ्यासासाठी पुस्तके ग्रंथालयातून घ्यावीत लागत होती किंवा ते फक्त रेल्वे ग्रंथालयातच उपलब्ध असायची. त्यामुळे अनेक अडचणी विद्यार्थ्यांना येत होत्या. मात्र या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आता सोपे झाले आहे. त्यामुळे या वेबसाईटचा फायदा विद्यार्थी वर्गाला मोठया प्रमाणात होणार आहे.

रेल्वे कर्मचार्‍यांना सोयीस्कर रेल्वे काम करणारे अनेक कर्मचार्‍यांना या वेबसाईटचा फायदा होणार आहे. कारण यात प्रक्षिणासाठी ऑनलाईन प्रशिक्षण लिंक्स देण्यात आले आहे. त्याप्रमाणे रेल्वे कर्मचारी तंज्ञ व्यक्तीचे व्याख्याने बघू शकणार आहेत. तसेच कर्मचारी सुध्दा व्याख्याने देऊ शकणार आहेत. इतकेच नव्हेतर रेल्वे कर्मचार्‍यांना रेल्वेचा विभागीय परिक्षेच्या तयारीसाठी या वेबसाईटचा मोठा फायदा होणार आहे.⭕

Previous article🛑 Amazon Prime Day 2020: 6 आणि 7 ऑगस्टला वस्तूंवर ऑफर 🛑
Next article🛑 एनडीए आणि जेईई मेन परीक्षांच्या तारखा क्लॅश होत आहेत. दोन्ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात आहेत. 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here