• Home
  • 🛑 एनडीए आणि जेईई मेन परीक्षांच्या तारखा क्लॅश होत आहेत. दोन्ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात आहेत. 🛑

🛑 एनडीए आणि जेईई मेन परीक्षांच्या तारखा क्लॅश होत आहेत. दोन्ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात आहेत. 🛑

🛑 एनडीए आणि जेईई मेन परीक्षांच्या तारखा क्लॅश होत आहेत. दोन्ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात आहेत. 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 23 जुलै : ⭕ देशातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी जेईई मेन ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा लांबणीवर पडत आता सप्टेंबरमध्ये घेतली जाणार आहे. मात्र याच परीक्षेच्या वेळी एनडीएची परीक्षादेखील होणार आहे. परिणामी दोन्ही परीक्षा क्लॅश होत आहेत. केंद्र सरकारने याची दखल घेतली आहे. या क्लॅशमुळे कदाचित जेईई मेन परीक्षेची तारीख बदलू शकते.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी यासंबंधी ट्विट केले होते. त्यांनी लिहिले होते की ‘मला काही विद्यार्थ्यांकडून कळले की एनडीए परीक्षेची तारीख आणि जेईई मेन परीक्षेची तारीख एकाच वेळी आहेत. परिणामी या प्रकरणाची चौकीशी केली गेली आहे. जेईई आणि एनडीए दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याची गरज नाही. दोन्ही परीक्षांच्या तारखा क्लॅश होणार नाहीत, हे एनटीए पाहील.’

जेईई मेनची तारीख बदलणार यावर्षी एकूण सुमारे ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई मेनसाठी अर्ज केले आहेत. जेईई मेन परीक्षा भारतातील सर्व अभियांत्रिकी माहाविद्यालयातील प्रवेशांसाठी दिली जाते. जेईई नंतर विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्ड क्लिअर करावी लागते. एनडीए परीक्षेच्या तारखांच्या क्लॅशमुळे तारखांमध्ये काही बदल होऊ शकतो.

यावर्षी विद्यार्थ्यांना जेईई मेन आणि नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप वेळ मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळाल्याने यावर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील आणि परिणामी कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने करोना व्हायरस संक्रमणापासून सुरक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला निर्देश दिले आहेत की परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट करा, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवा. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची संख्या कमी ठेवा. याव्यतिरिक्त मास्क घालणे अनिवार्य आहे, तसेच परीक्षा केंद्रांवर शरीराचे तापमान मोजण्याचीदेखील व्यवस्था करण्यात येणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment