Home परभणी सुमनताई विद्यालयात मानवाधिकार समिती मार्फत माहिती अधिकार दीन साजरा

सुमनताई विद्यालयात मानवाधिकार समिती मार्फत माहिती अधिकार दीन साजरा

205

आशाताई बच्छाव

IMG-20220929-WA0037.jpg

सुमनताई विद्यालयात मानवाधिकार समिती मार्फत माहिती अधिकार दीन साजरा

शत्रुघ्न काकडे पाटील:-जिल्हा प्रतिनिधी (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)
परभणी:- दिनांक 28 सप्टेंबर रोजी परभणी शहरातील सुमन ताई गव्हाणे विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना व पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार जनजागृती कार्यक्रम मानवाधिकार चे मराठवाडा अध्यक्ष मा. राहुल नामदेव पाईकराव यांच्या अध्यक्षतेखाली व मा. प्रा. रफीक शेख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या प्रसंगी ‘ माहिती अधिकार काळाची गरज ‘ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करून पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख अधितिगणाचे स्वागत विद्यालयाच्या बँड पथका मार्फत बँड वाजवून करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माहिती अधिकारचे मराठवाड़ा उपाध्यक्ष मा. यंकटी नरबाजी मोरे व माहिती अधिकारच्या मराठवाडा विभागीय महिला वरिष्ठ उपाध्यक्ष सौ. सावित्री प्रल्हाद लाखुडे यांची होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंटरनॅशनल ह्युमन राईट्सच्या परभणी जिल्हा अध्यक्षा सौ. संघमित्रा दामोधरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेच्या युवा उपसचिव कु. सृष्टी मुळे यांनी केले.
या वेळी मा. दिनाजी विठ्ठल गायकवाड, सौ. धम्मशिला दिनाजी गायकवाड, चंद्रप्रकाश भीमराव वाळके, सौ. सूर्यकांता माधव गायकवाड, स्वप्निल मनोहर मोरे, संदिप ढोंडबाराव होडगीर, कोंडिबा गौनाजी मस्के व विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसंग्रामपूर तहसीलदार विरुद्धच्या तलाठी काम बंद आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! वरिष्ठांकडून होणार चौकशी.?
Next articleशालेय विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको ठिय्या आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.