Home बुलढाणा संग्रामपूर तहसीलदार विरुद्धच्या तलाठी काम बंद आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! वरिष्ठांकडून होणार चौकशी.?

संग्रामपूर तहसीलदार विरुद्धच्या तलाठी काम बंद आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! वरिष्ठांकडून होणार चौकशी.?

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220930-WA0003.jpg

संग्रामपूर तहसीलदार विरुद्धच्या तलाठी काम बंद आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! वरिष्ठांकडून होणार चौकशी.?

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर तालुक्याचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना सातत्याने अप शब्दाचा वापर करतात. त्यामुळे तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचा अवमान होत असतो. सध्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षण सुरू आहे अशाही परिस्थितीत आम जनतेसमोर संग्रामपूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे तलाठ्यांना मारा, ठोका असे शब्द वापरतात. त्यामुळे जनतेच्या मनात तलाठी मंडल अधिकाऱ्यांबद्दल रोष व द्वेष निर्माण होतो. व तलाठी , मंडल अधिकाऱ्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलते. त्यामुळे तहसीलदारांनी दिलेल्या वागणुकीबद्दल वरिष्ठांकडे वारंवार विदर्भ पटवारी संघाने निवेदन देऊनही त्यांच्यावर कसलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे तलाठ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे तहसीलदार हे संबंधित तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांवर विनाकारण कारवाई करू शकतात. तलाठ्यांनी दिनांक 19 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने जळगाव जामोद उपविभागातील तलाठ्यांनी दिनांक 27 सप्टेंबर रोजी काळेफिती लावून काम केले आणि दिनांक 28 सप्टेंबर रोजी जळगाव संग्रामपूर तालुक्यातील तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. यानंतरही वरिष्ठांनी तहसीलदार वरणगावकर यांच्यावर काही कारवाई केली नाही तर २९ सप्टेंबर रोजी सर्व तलाठी आपल्या डी एस सी तहसीलदारांकडे जमा करणार होते.आणि 30 सप्टेंबर पासून निवडणूक व नैसर्गिक आपत्तीची कामे वगळता ते बेमुदत सामूहिक रजा आंदोलन करणार होते व या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महसूल प्रशासनावर राहील तसेच अतिवृष्टीच्या नुकसानीचे युद्ध पातळीवर सर्वे सुरू असताना तलाठ्यांचे हे आंदोलन शेतकऱ्यांचे नुकसान करणारे ठरू शकते म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सिद्धेश्वर वरणगावकर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विदर्भ पटवारी संघाच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या कार्यालयात विदर्भ पटवारी संघटनेचे उपविभागातील तलाठी व मंडळ अधिकारी व जिल्हाध्यक्ष आणि तहसीलदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांची महत्त्वपूर्ण मीटिंग पार पडली असून या ठिकाणी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी स्वतः उपस्थित राहून अनाथानाने माझ्या तोंडून काही चुकीचे शब्द निघाले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले व यापुढे असे घडणार नाही अशी ग्वाही दिली व वरिष्ठांनी यावर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची चौकशी करणे कामी चौकशी समिती नेमून पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले. त्यावर विदर्भ पटवारी संघाने तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्याविरुद्धचा पुकारलेला संप हा आपल्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये म्हणूनच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा अहवाल व शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून आणि वरिष्ठांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले म्हणून तहसीलदार विरुद्ध पुकारलेले काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती विदर्भ पटवारी संघाकडून मिळाली आहे .
तहसीलदार वरणगावकर हे अशाच वाचाळ सवयीमुळे माहूर येथे कार्यरत असताना सुद्धा तेथील तलाठी व महसूल कर्मचारीही वरणगावकर यांची बदली होईपर्यंत आंदोलनाला बसले होते. त्यावर संग्रामपूर येथे बदलीवर आल्यानंतर तहसीलदार यांच्या नेहमीच मुखात शिवराळ भाषा असल्यामुळे संग्रामपूर येथे आल्या आल्या काही नागरिक रेतीमापक्यांविरुद्ध तक्रार घेऊन आले असता त्यांना सुद्धा अश्लील शिवीगाळ केली होती. व त्यावेळेस तलाठ्यांना सुद्धा टार्गेट केल्या गेले होते. असा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता परंतु येथे मात्र वरिष्ठ अधिकारी यांचे संग्रामपूर तालुक्याकडे असलेले दुर्लक्ष दिसून आले. कारण वरणगावकर यांच्या सवयीला वरिष्ठांकडून लगाम लावण्यात आला नसल्यामुळे पहिल्यापेक्षाही त्यांच्या वाचाळ सवयीमुळे दैनंदिन महसूल विभागात काम करणारे तलाठी मंडळ अधिकारी वैतागले होते. आणि शेतकरी व नागरिक काही कामानिमित्तांने तहसील कार्यालयात शेती विषयी किंवा इतर तहसील कार्यालयात असलेले कोणतेही पब्लिक डॉक्युमेंट असणारे कागदपत्रासाठी रिक्चर नक्कल अर्ज करून पैसे भरूनही तहसीलदार यांच्याकडून नक्कल देण्यास मनाई करण्यात येते आणि संबंधित नागरिकांनी जर तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांना नक्कल मागितल्यास नागरिकांना ही सर्व माहिती तलाठ्याकडून घ्यायची तलाठ्यास मागा व देत नसतील तर त्यांना मारहाण करा तिकडे काहीही करा असे सांगून सामान्य व आदिवासी बहुल तालुक्यातील शेतकऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती देत त्यांना फडकवण्याचे काम तहसीलदार वरणगावकर नेहमीच करत आहेत परंतु आता या सवयीला कायमस्वरूपी लगाम लागावा याकरिता त्याची बदली व्हावी व त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी तालुक्यातील सर्व सामान्य शेतकरी व नागरिकांची मागणी आहे.

Previous articleआदिवासी भागात घरा देव आदीम पध्दतीने केला जातोय साजरा
Next articleसुमनताई विद्यालयात मानवाधिकार समिती मार्फत माहिती अधिकार दीन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here