Home बुलढाणा शालेय विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको ठिय्या आंदोलन

शालेय विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको ठिय्या आंदोलन

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20220929-WA0027.jpg

शालेय विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको ठिय्या आंदोलन

युवा मराठा वेब न्युज पोर्टल
प्रतीनिधी-रवि शिरस्कार संग्रामपूर

बुलढाणा जिल्ह्यातील सावळा गावातील शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्याकरिता वरवट बकाल-जळगाव जा.राष्ट्रीय महामार्ग अडवीला

संग्रामपूर तालुक्‍यातील सावळा गावातील शालेय विद्यार्थ्यांनी गावापासून सावळा गावाच्या वेशीपर्यंत किमान 3 किमी असा पायी .प्रवास गेल्या कित्येक वर्षांपासून करावा लागत आहे पावसाळ्यामध्ये या रस्त्याने जाता- येता शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या वाहनांची सोय नाही.त्याचप्रमाणे या गावात शालेय विद्यार्थ्यांनी आज मानव विकास अभियान अंतर्गत सावळा ते निवाणा ही बसफेरी सुरू करावी ही मागणी धरून आज राष्ट्रीय महामार्ग जळगांव रोड,मुख्य रस्ता-सावळा फाटा रस्ता अडवीला त्यामुळे हा मुख्य रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता जवळपास दोन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.विद्यार्थ्यांनी घोषणा देताना प्रशासन, सार्वजनिक बंधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.याआंदोलनाची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी आंदोलनस्थळी पोहोचून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी,पालकांसोबत चर्चा केली आणि अडविलेला रस्त्यावरील आंदोलन मागे घेण्याची विनंती केली या आंदोलनाचे कारण असे की गावकऱ्यांनी या रस्त्याकरिता केलेल्या निवेदनावरून जिल्हा नियोजन अधिकारी तसेच मानव विकास समिती बुलढाणा यांनी दि 30 ऑगेस्ट रोजी हा रस्ता दुरुस्ती करून बस सुरू करण्याचे पत्र दिले होते त्यामध्ये प्रतिलिपीत जिल्हा परिषद बुलढाणा, खाजगी सचिव मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गटविकास अधिकारी, आगार व्यवस्थापक, गटशिक्षण अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वांना प्रत दिली होती तरीसुद्धा यापैकी कोणतेही अधिकारी हा रस्ता पाहण्याकरिता सुद्धा आलेले नाहीत त्यामुळे संताप व्यक्त करत आम्ही आज दि.28 सप्टेंबर रोजी हे आंदोलन केलेले आहे असे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान निवाना फाट्यावरील बाप्पू साहेब देशमुख विद्यालय चे अद्यक्ष राजेश्वर देशमुख यांनी जिल्हा नियोजक मंडळ बुलढाणा येथील वरिष्ठ अधिकारी बुरजे यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क करून हा सर्व आंदोलनाचा विषय मांडला आणि त्यांचे तामगाव पोलीस उपनिरीक्षक विखे यांच्याशी बोलणे करून दिले विखे यांनी स्वतः दूरध्वनी वर बोलतांना सांगितले की हे आंदोलनं सार्वजनिक बांधकाम विभाग,किंवा गट शिक्षणाधिकारी आल्याशिवाय हटणार नाही असे लोक सांगत आहे आणि हा मुख्य रस्ता अडवुन बसले लोकांचे कामे ढेपाळली आहे,एकतर तुम्ही इथे या पाहून नाहीतर इतर स्थानिक अधिकारी पाठवा.बुरजे यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी सांगितले की जिल्हा नियोजन मंडळाद्वारे लवकरच त्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दूरध्वनी द्वारे त्यांनी दिले असता पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी,पालक यांना माहिती दिली. आणि अश्याप्रकारे सदर आंदोलन तूर्तास स्थगित झाले आणि रस्त्यावर जमा झालेली वाहने पोलिसांनी बाहेर काढली.यावेळी तामगाव पोलीस निरीक्षक उलमाले,उपनिरीक्षक विखे यांच्यासह इतर कर्मचारी, सावळा गावातील सर्व रहिवासी व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleसुमनताई विद्यालयात मानवाधिकार समिती मार्फत माहिती अधिकार दीन साजरा
Next articleचिखली प्राधिकरण येथे मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड ; अपना वतन संघटनेची तक्रार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here