Home नांदेड खरीप हंगाम सुरू होण्याच्या शुभमुहूर्तावर रासायनिक खताच्या दरवाढ केल्याने शेतकऱ्यात तीव्र असंतोष.

खरीप हंगाम सुरू होण्याच्या शुभमुहूर्तावर रासायनिक खताच्या दरवाढ केल्याने शेतकऱ्यात तीव्र असंतोष.

112
0

राजेंद्र पाटील राऊत

खरीप हंगाम सुरू होण्याच्या शुभमुहूर्तावर रासायनिक खताच्या दरवाढ केल्याने शेतकऱ्यात तीव्र असंतोष.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

 

खरीप हंगाम सुरू होण्याआधीच रासायनिक खतांच्या किमतीत भाववाढ झाल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच कोरोना सारख्या महामारीने जीवनावश्यक वस्तूच्या झालेल्या दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे या दरवाढीचा फटका लाखो शेतकऱ्यांना बसला आहे. किसान युवा क्रांती मुखेड व शेतकरी पुत्र तर्फे दरपत्रक ची होळी करून निषेध व्यक्त केला. यावेळी बालाजी पाटील सांगवीकर, दत्ता पाटील इंगोले, सुभाष पाटील औराळकर, बालाजी पाटील मसलगेकर व सर्व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here