Home पुणे चिखली प्राधिकरण येथे मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड ; अपना वतन संघटनेची तक्रार

चिखली प्राधिकरण येथे मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड ; अपना वतन संघटनेची तक्रार

86
0

आशाताई बच्छाव

IMG-20220929-WA0017.jpg

चिखली प्राधिकरण येथे मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड ; अपना वतन संघटनेची तक्रार                    पुणे,(प्रतिनिधी उमेश पाटील)
सेक्टर न १८ , शिवतेजनगर , ( खदान ) परिसरामध्ये विनापरवाना अवैधरित्या वृक्षतोड सुरु असल्याबाबत अपना वतन संघटनेला तक्रार प्राप्त झाल्यांनतर अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख , पिंपरी चिचंवड शहर कार्याध्यक्ष हमीद शेख , महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , नीरज कडू यांनी सदर ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता ४० झाडे तोडल्याचे व त्याची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर बाबत उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे व उद्यान अधीक्षक गोस्वामी साहेबाना फोन करून याबाबत कल्पना दिली . तसेच मा. आयुक्त साहेब , पिंपरी चिंचवड महानगरपालिका , उद्यान अधीक्षक यांना लेखी तक्रार अर्ज दिला आहे.
अपना वतन संघटनेने मागील काही दिवसांपूर्वी फॉर्मायका कंपनीतील अवैध वृक्षतोडीबाबतचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर कंपनी मालकाला ४५ लाखाचा दंड थोटवण्यात आला होता . हे प्रकरण ताजे असतानाच चिचंवड मध्ये अशा प्रकारेच मोठ्या प्रमाणावर वृक्षांच्या कत्तली करून त्यांची वाहतूक व विक्री करण्यात येत आहे. सेक्टर न १८, ओयो सिल्व्हर की हॉटेल , शिवतेजनगर , चिखली प्राधिकरण ,चिचंवड ( खदान ) याठिकाणी असलेल्या शेकडो झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी बऱ्याच वर्षांपासूनची आंबा , सागवान ,लिब , बाभूळ , पिंपळ , वडाची जुनी झाडे अस्तित्वात आहेत . मात्र उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे  ठेकेदारांकडून येथील वृक्षांची मोठ्या प्रमाणवर वृक्षतोड चालू आहे. एकीकडे शासनस्तरावर वृक्ष लागवडीचे संवर्धनाचे उपक्रम सुरु असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून वृक्षतोड दुर्लक्ष केले जात आहे.  संबंधितांनी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम 1975  कलम ८(१) चे उल्लंघन केले आहे. वृक्षतोड करून संबंधितांनी पर्यावरणाची मोठी हानी केली आहे.त्यामुळे या ठिकाणचे जागा मालक , वृक्षतोड करणारे व वृक्षांची वाहतूक करून विक्री करणारे व ते वृक्ष विकत घेणारे वखारीचे मालक या सर्वांची सखोल चौकशी करून  गुन्हे दाखल करावेत .  तसेच महापालिकेच्या उद्यान विभागाकडून तात्काळ या ठिकीणच्या वृक्षतोडीचा  पंचनामा करून तात्काळ कारवाई करण्यात यावी.अशी मागणी अपना संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने पालिकेने दंडाबरोबरच गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे संघटनेच्या वतीने म्हंटले आहे.

Previous articleशालेय विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको ठिय्या आंदोलन
Next articleमनविसेच्या भोटा ते कालवड पर्यंत रस्ता दुरुस्तीसाठीचे उपोषण लेखी आश्वासनानंतर तुर्तास स्थगित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here