Home मुंबई भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना अनोखे अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना अनोखे अभिवादन

87
0

राजेंद्र पाटील राऊत

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना अनोखे अभिवादन
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज)
कल्याण मुंबई
6 डिसेंबरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दादर येथील चैत्यभूमी येथे न जाता त्यांना ऑनलाईन घरातूनच अभिवादन करण्याचे आंबेडकरी अनुयायांनी ठरवले आहे. डॉ आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी संविधानाची प्रतिकृती तसेच कविता ,बाबासाहेबांचे विचार पोस्ट कार्ड द्वारे लिहून ते चैत्यभूमी येथे पाठवले जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी लाखोंच्या संख्येने अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे येतात. अगदी वादळ वारा पाऊस थंडी असे कोणतेही नैसर्गिक संकट आले तरी अबाल वृद्ध महिला जय भीम चा जयघोष करत येथे येतात. मात्र मागील आठ महिने देशात वाढत्या कोरोणा चे वाढते सावट व त्यामुळे झालेले लोकांची मृत्यू ही सर्व परिस्थिती लक्षात घेता चैत्यभूमी येथे गर्दी न करता घरातूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
**विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी पोस्टकार्ड द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची संकल्पना मांडली. कोरोना काळात ही संकल्पना राबविणे सोयीस्कर आहे. त्यामुळे 100 पोस्टर चैत्यभूमीच्या पत्त्यावर पाठविलेली आहेत. आणखी एक हजार पोस्टकार्ड
डोंबिवलीतील आंबेडकरी अनुयायांना देणार आहे. त्यांच्याकडून अभिवादना चे पोस्टकार्ड लवकरच चैत्यभूमीवर दाखल होतील. त्यामुळे चैत्यभूमी येथे गर्दी न होता कोरोना चा संसर्ग टाळता येणार आहे असे डोंबिवलीचे सामाजिक कार्यकर्ते श्री किरण शिंदे यांनी सांगितले आहे.
युवा मराठा न्यूज व संपूर्ण परिवारातर्फे भारतरत्न विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करत आहेत.
जय भीम जय शिवराय🌷🌷

Previous articleयुवा मराठा न्यूज इफेक्ट..बातमीचा दणका दोघ भाऊ आले अखेर वठणीवर..!
Next articleकांदा निर्यात बंदी उठवा- तहसीलदारांना निवेदन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here