Home Breaking News 🛑 Amazon Prime Day 2020: 6 आणि 7 ऑगस्टला वस्तूंवर ऑफर 🛑

🛑 Amazon Prime Day 2020: 6 आणि 7 ऑगस्टला वस्तूंवर ऑफर 🛑

137
0

🛑 Amazon Prime Day 2020: 6 आणि 7 ऑगस्टला वस्तूंवर ऑफर 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 23 जुलै : ⭕ अ‍ॅमेझॉन इंडियाने बुधवारी ‘मॉन्सून अप्लायसेस स्टोअर’ सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये घर आणि स्वयंपाकघरातील उपकरणासह अन्य मोठ्या उपकरणांवर सूट मिळेल. ग्राहक त्यांच्या आवडीच्या ब्रँडवर 26 जुलै पर्यंत चांगल्या ऑफर घेऊ शकतात. Amazon अॅमेझॉनच्या ‘मॉन्सून अप्लायन्स स्टोअर’ सेलमध्ये आयसीआयसीआय (ICICI) क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून ईएमआय व्यवहारांवर 1,500 रुपयांपर्यंतची त्वरित सवलत मिळेल. सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल आणि इतर मोठ्या ब्रॅण्ड्सना या विक्रीत मोठी सूट मिळू शकते. या सेलमध्ये एक्सचेंज ऑफर, ईएमआय पर्याय यासारख्या ऑफर देखील आहेत. या सेलमध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर यासारख्या वस्तू 50 टक्क्यांपर्यंत सवलतीत खरेदी करता येतील.

फ्रंट लोड वॉशिंग मशीन 16,999 रुपयांपासून सुरु होते. तर टॉप लोड वॉशिंग मशीन 10,999 रुपयांपासून खरेदी करता येतील. सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 7,149 रुपयांपासून खरेदी करता येऊ शकते.

दुसरीकडे वॉटर प्युरिफायर्सवर 50 टक्के सूट आहे. 11,500 रुपयांपासून तुम्ही ते खरेदी करु शकता. याशिवाय रेफ्रिजरेटरवर नो कॉस्ट ईएमआई आणि एक्सचेंज ऑफर्स आहेत. साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्सवर कमीतकमी 40 टक्के पर्यंत सूट आहे. बेस्ट सेलिंग एयर कंडीशनर 1,799 रुपये प्रति महिन्याच्या इएमआयवर खरेदी करता येऊ शकते. नो-कॉस्ट ईएमआई, एक्सचेंज ऑफर आणि शेड्यूल्ड डिलिवरी सारखे पर्याय यामध्ये देण्यात आले आहेत. 17,499 रुपयांपासून एसी देखील खरेदी करता येऊ शकते.⭕

Previous article🛑 पुणे महापालिकेची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आँनलाईन सभा…! 🛑
Next article🛑 ‘रेल्वे’पिडिया आता ऑनलाईन मोडमध्ये आता घरबसल्या 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here