• Home
  • मुखेड शहरात रोज मागून खाणाऱ्या महिलेचा भुकेने मृत्यू.

मुखेड शहरात रोज मागून खाणाऱ्या महिलेचा भुकेने मृत्यू.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210401-WA0000.jpg

मुखेड शहरात रोज मागून खाणाऱ्या महिलेचा भुकेने मृत्यू.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड शहर कडक बंद असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून अन्नपाणी न मिळाल्याने भूक बळीने व उन्हाचा तडाखा बसल्याने एक वयोवृद्ध वेडसर महिलेचा मृत्यू झाला ही घटना शहरातील बाराहळी नाका येथील डीवाईडर वर सोमवारी सायंकाळी सात वाजता उघडकीस आली पोलिस पाटील माधव  टाकळे यांनी त्या बेवारस वेडसर  महिलेवर अंत्यसंस्कार केले.
गेल्या सात दिवसांपासून कोरोना चे रुग्ण वाढत असल्याने शहरात कडक बंद आहे . वाटसरू,  प्राण्यांचे बेहाल होताना दिसत आहेत तीन ते चार वेडसर महिला व पुरुष मुखेड शहरात वास्तव्यास असून हॉटेल वाले त्या वेडसर लोकांना चहापाणी फराळाची मोफत व्यवस्था करत मात्र कडकलाँकडाऊन असल्याने हॉटेल कडकडीत बंद आहेत त्यामुळे वेडसर लोकांचे बेहाल होवून भुकेने व्याकुळ होत आहे दरम्यान बेवारस वेडसर महिला बाराहळी नाका परिसरात अनेक दिवसापासून वास्तव्यास आहे त्या महिलेला त्या भागातील हाँटेल चालक चहापाणी फराळाची व्यवस्था करत मात्र कडकडीत बंद असल्याने ती वयोवृद्ध वेडसर महिला अन्न पाण्याविना दिवस काढले  कडक ऊन्ह  व अन्न पाणी नसल्याने ही महिला सोमवारी सायंकाळी सातच्या दरम्यान मृत्यू पावली ही माहिती पोलिस पाटील माधव टाकळे यांना माहिती समजतात घटनास्थळी धाव घेऊन उघड्या मृतदेहावर शाल पाघरून ही  माहिती नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला कळविले मात्र  याकडे न.पा.प्रशासन दुर्लक्ष करून मृतदेह उचलण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही त्यामुळे शेवटी माधव टाकळे  ,पत्रकार सुशील पत्की व पोलिसांनी मयत महिलेचे मृतदेह एका अँटोत टाकून  उपजिल्हा रुग्णालय दाखल केले त्या महिलेच्या शवविच्छेदन नंतर  पोलीस पाटील माधव टाकळे यांनी स्वखर्चाने त्या महिलेवर  अंत्यसंस्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासली

anews Banner

Leave A Comment