राजेंद्र पाटील राऊत
निवळी गोळीबारातील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
निवळी तालुका मुखेड येथील युवक तिरुपती रानबा पपुलवाड खाजगी कामानिमित्त ९ मार्च रोजी सकाळी देगलूर तालुक्यातील करडखेड ता.देगलुर येथील आपल्या मित्रास भेटून आपल्या गावाकडे मोटारसायकलीने परत येत असताना पाठीमागून सिनेस्टाईल पलसर गाडीने पाठलाग करून नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर निवळी शिवारातील गणपती मंदिराजवळ गोळीबार झाला होता त्यात तिरुपती पपुलवाड गंभीर जखमी झाला होता पोलिसांनी मागील २० दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे तपासाचे चक्र फिरवित अखेर आरोपींना अटक केली आहे अजूनही काही आरोपी असन्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांकडून समजते.