Home माझं गाव माझं गा-हाणं वाळवणी पदार्थ करण्यासाठी महिलांची लगभग सुरू ; ग्रीष्म ऋतूतील महिलाचा घरगुती उद्योग...

वाळवणी पदार्थ करण्यासाठी महिलांची लगभग सुरू ; ग्रीष्म ऋतूतील महिलाचा घरगुती उद्योग जोमात

105
0

राजेंद्र पाटील राऊत

वाळवणी पदार्थ करण्यासाठी महिलांची लगभग सुरू ; ग्रीष्म ऋतूतील महिलाचा घरगुती उद्योग जोमात
वाखारी ( प्रतिनिधी ) दादाजी हिरे/ युवा मराठा न्युज नेटवर्क
: अरे संसार संसार ,,,, या बहिनाबाईच्या कविते प्रमाणे महिलांना घरात काय हवय काय नको ? याची नेहमी चिंता असते . म्हणूनच नाशिक जिल्ह्यातील  गावागावात व परिसरात महिलांची वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी लगभग सुरू झाली आहे .
महाराष्ट्रात पुर्वी शेती मशागतीतुन उसंत मिळताच व पुढे लग्न कार्य आसल्यास किंवा हातचे पदार्थ म्हणून गव्हापासून शेवया , कुरर्डया ,बाजरी पासून खारोड्या,वडे, ज्वारी पासून पापड , तांदळापासून पापड , चकल्या,उडीदापासुन वडे ,पापड, मुंगाचीदाळ मुंगवडया , बटाट्या पासून चिप्स , चकल्या ,शाबुदाना चिप्स , चकल्या आदि वाळवणाचे पदार्थ वर्ष भर घरात वेग वेगळ्या वेळी किंवा सणावारा सह उपवासासाठी तळून वापरले जातात . हा वाणेाळा प्रत्येक घरात असावेत हया साठी महिलांची धडपड असते . पुर्वी सर्व खरीप _ रब्बी पिके घरात काढून आणल्यानंतर ग्रिष्मरुतु मध्ये शेती मशागत कामे थांबताच महिला या उन्हाळी वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी कामाला लागतात . हा उदयोग एकटी – दुकटीला जड वाटत असल्याने ऐक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ,,, या उक्ती प्रमाणे हेळून मेळून शेजार पाजारनी एकत्र येऊन हा उद्योग सुरू होतो . शहरात यंत्र उद्योग उपलब्ध व बाजारात तयार मिळत असल्याने आणि आता यंत्र बचत गटांच्या समुह उदयोगातुन उपलब्ध होत असल्याने विकत घेतात परंतु ग्रामिण भागात महिला घरीच तयार करत असतात . आता शेवया तयार करण्याचे यंत्र आले असून त्यामुळे रोजगार तयार झाला आहे . तर काही महिला रोजंदारी वर मदत करत असल्याने त्यांना रोजगार मिळाला आहे पूर्वी शेवया फळी पाटावर केल्या जात असत त्याची चव व पध्दत वेगळीच होती .
________________

Previous articleशरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात केले दाखल ,आजच शस्त्रक्रिया करणार…? 🛑
Next articleनिवळी गोळीबारातील आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here