Home माझं गाव माझं गा-हाणं दुकानदार महिलेच्या गळ्यातून खेचून नेली चोरटयांनी सोन्यांची पोत

दुकानदार महिलेच्या गळ्यातून खेचून नेली चोरटयांनी सोन्यांची पोत

116
0

राजेंद्र पाटील राऊत

दुकानदार महिलेच्या गळ्यातून खेचून नेली चोरटयांनी सोन्यांची पोत
वाखारी,(दादाजी हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- देवळा तालुक्यातल्या देवळा -वाखारी रस्त्यावरील उज्वल किराणा दुकानात चोरट्यांनी प्रवेश करीत व चाँकलेट गोळ्या घेण्याचा बहाणा करुन दुकानदार महिलेच्या गळ्यातील दिड तोळ्यांची सोन्याची पोत खेचून पळ काढला.
हि घटना मंगळवारी ता.१५ रोजी घडली.या घटनेबाबत देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान उज्वल प्रोव्हिजन या किराणा दुकानात दोन अनोळखी व्यक्ती चाँकलेट गोळ्या घेण्याच्या बहाण्याने आल्या होत्या.यातील एकाने वैशाली शेवाळकर यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून दुचाकीवरुन पोबारा केला.याबाबत हरिश्चंद्र शेवाळकर यांनी देवळा पोलिसात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक के.वाय.भवर अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here