• Home
  • अंतिम पैसेवारी 50 पैशाच्या खाली नांदेड जिल्ह्यातील खरिपाची पैसेवारी जाहीर दुष्काळी उपाययोजना होणार लागू

अंतिम पैसेवारी 50 पैशाच्या खाली नांदेड जिल्ह्यातील खरिपाची पैसेवारी जाहीर दुष्काळी उपाययोजना होणार लागू

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201217-WA0049.jpg

अंतिम पैसेवारी 50 पैशाच्या खाली नांदेड जिल्ह्यातील खरिपाची पैसेवारी जाहीर दुष्काळी उपाययोजना होणार लागू

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड – जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी दिनांक 15 रोजी जाहीर केली आहे नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्याची पैसेवारी 50 पैशाच्या खाली आली. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी लवकरच होणार आहे .कृषी उत्पादनांचा निकष निर्धारित करण्यासाठी राज्यात पिक पैसेवारी पद्धतीचा अवलंब करण्यात येतो .यात राज्य शासनाच्या कृषी महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून पिकांची पैसेवारी निश्चित करण्यात येत असते शासन आदेशानुसार निर्धारित वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाने तारीख 30 सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारी जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले होते .यात सर्वच 16 तालुक्यांची पैसेवारी 50 पैशांच्या वर जाहीर करण्यात आली या नंतर शासन नियमानुसार सुधारित पैसेवारी 31 ऑक्टोंबर रोजी जाहीर झाली. यात सर्व तालुक्यांची पैसेवारी 50 पैशाच्या खाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविले .यंदा सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर ऑक्टोबर मधील जिल्ह्यातील एकूण 1562 गावातील 8 लाख 42 हजार 867 हेक्टर लागवडीलायक क्षेत्रापैकी 7 लाख 85 हजार 33 हेक्‍टरवर पेरणी झालेल्या पिकांची कृषी महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून अंतिम पैसेवारी निश्चित करण्यात आली आहे. दरवर्षी हंगामी पैसेवारी तीन टप्प्यात 30 सप्टेंबर सुधारित पैसेवारी 31 ऑक्टोबर तर अंतिम पैसेवारी 15 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन जाहीर करते शासनाच्या 3 नोव्हेंबर 2015 च्या शासन आदेशानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारी पद्धतीचा आधार घेतला जातो

anews Banner

Leave A Comment