Home नांदेड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा २०२९ च्या निवडणुकीचा पाया आहे – प्रदेशाध्यक्ष ना....

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा २०२९ च्या निवडणुकीचा पाया आहे – प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील

133
0

राजेंद्र पाटील राऊत

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा २०२९ च्या निवडणुकीचा पाया आहे – प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील

विशेष प्रतनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि. १७- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सेलची नवीन प्रदेश कार्यकारिणी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा २०२९च्या निवडणुकीचा मुख्य पाया आहे, असे मत जयंत पाटील यांनी यावेळी मांडले. मागील कालखंडात यश-अपयश अनुभवत आपण पक्ष मोठा केला, आजही करत आहोत. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या १५० पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असं काम आपल्याला करायचं आहे, असे ते म्हणाले. त्यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये आपली संघटना असायला हवी, संघटनेने चळवळ करावी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे मार्गदर्शन जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान यांनी बैठकीला संबोधित करताना राजकारणापेक्षा समजाकार्यावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हे पद कायमस्वरूपी नाही, जो काम करेल त्याला पदावर राहता येईल, एकदा काम करणं थांबलं की पद राहणार नाही याची जाणीव सर्वांनी ठेवायला ठेवावी, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास आ. अमोल मिटकरी, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे तसेच विद्यार्थी सेलचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Previous article१५२ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क आतापर्यंत २३९४३ व्यक्तिं विरुध्द कारवाई
Next articleदुकानदार महिलेच्या गळ्यातून खेचून नेली चोरटयांनी सोन्यांची पोत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here