• Home
  • शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात केले दाखल ,आजच शस्त्रक्रिया करणार…? 🛑

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात केले दाखल ,आजच शस्त्रक्रिया करणार…? 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210330-WA0070.jpg

🛑 शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात केले दाखल ,आजच शस्त्रक्रिया करणार…? 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना असणारा पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांना आजच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

पोटदुखीचा त्रास असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्या बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येवून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार होती.

मात्र त्यांचा पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांना आजच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे समजते.आज दुपारी शरद पवार यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता.

त्यामुळे ब्रीच कँडी रूग्णालयातील डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली. त्यानुसार आज संध्याकाळी शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि कन्या खासदार सुप्रिया सुळे होत्या.त्यांना असणारा पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उद्या बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र आजच त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुढच्या तपासण्या व औषधोपचार येथेच होणार असून,परिस्थिती बघून शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ⭕

anews Banner

Leave A Comment