• Home
  • *मेंढपाळावर होत असलेल्या हल्ल्याबाबत यशवंत सेने तर्फे आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*मेंढपाळावर होत असलेल्या हल्ल्याबाबत यशवंत सेने तर्फे आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*मेंढपाळावर होत असलेल्या हल्ल्याबाबत यशवंत सेने तर्फे आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)
✍️यशवंत सेनेतर्फे मा.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
राज्याच्या विविध भागात मेंढपाळावर होत असलेल्या हल्ल्याबाबत यशवंत सेने तर्फे आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मागील महिन्यात कुकडी ता.पारनेर जिल्हा अहमदनगर येथील मेंढपाळ व त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना मारहाणीचे प्रकरणाची शाई सुकते न सुकते तोच पाटस ता.दौड जिल्हा पुणे येथे मेंढपाळाला मारहाण झाली. मागील काही महिन्यांपासुण राज्यात लातूर, सोलापूर, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, पुणे,बुलढाणा जिल्ह्यात मेंढपाळांना मारहाणीचे प्रकार वाढत आहेत.
सदर मारहाणीच्या घटना लवकरात लवकर थांबवल्या नाहीतर यशवंत सेना उग्र आंदोलन उभे करेल व त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल असा निर्वाणीचा इशारा निवेदनात देण्यात आला.
याप्रसंगी यशवंत सेनेचे प्रदेश महासचिव मा.खंडेराव पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रमुख सौ.संगिताताई पाटील,जिल्हा अध्यक्ष अरुणदादा शिरोळे, शहर अध्यक्ष श्री.रतन हिरे,श्री.सदाशिव वाघ,श्री.विनायक काळदाते,ज्ञानेश्वर ढेपले आदी उपस्थित होते.
मा.जिल्हाधिकाऱ्यातर्फे उपजिल्हाधिकारी श्री.दत्तप्रसाद नडे यांनी निवेदन स्विकारले व योग्य पाउल उचलन्याचे आश्वासन दिले.

anews Banner

Leave A Comment