• Home
  • नांदगांव हत्याकांड ब्रेकिंग : हत्येपूर्वी महिलेवर अत्याचार झाल्याचा ग्रामस्थांचा संशय.. होणार महत्वपूर्ण खुलासा

नांदगांव हत्याकांड ब्रेकिंग : हत्येपूर्वी महिलेवर अत्याचार झाल्याचा ग्रामस्थांचा संशय.. होणार महत्वपूर्ण खुलासा

नांदगांव हत्याकांड ब्रेकिंग : हत्येपूर्वी महिलेवर अत्याचार झाल्याचा ग्रामस्थांचा संशय.. होणार महत्वपूर्ण खुलासा *याच बातमीची व्हिडीओ रिपोर्ट बघा युवा मराठा न्युज यु टुयूब चँनलवर

प्रतिनिधी= किरण अहिरराव युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र

नाशिक / नांदगाव : नांदगाव तालुक्यातील वाखारी ते जेऊर शिवारात आज पहाटे एकाच कुटूंबातील चौघांची निर्घुणपणे धारधार शस्त्राने निघृण हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या हत्याकांडामुळे नांदगाव-मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भाग हादरून गेला आहे. हत्याकांडाच्या तपासाची सूत्रे मालेगावच्या पोलिसांनी हाती घेतले असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून हत्यामागची शोधण्यात येत आहे. या तपासातून महत्वाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

हत्यापुर्वी महिलेवर अत्याचार.. गावकऱ्यांचा संशय

ज्या कुटूंबाची हत्या झाली ते चव्हाण कुटंबीय सर्वसाधारण असून जेऊर रस्त्याला असलेल्या वस्तीत ते राहत होते.

हत्या झालेल्या घरातील कपाटांची कोणीतरी चाचपडले असल्याचे दिसत होते. तसेच यावेळी मयत महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय गावकरी व्यक्त करीत होते. अर्थात तपासात अनेक बाबी पुढे येणार आहेत. त्याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे. असे असले तरी हत्येपूर्वी महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

असा घडला प्रकार
याबाबत माहिती अशी,नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील रिक्षाचालक असलेल्या समाधान चव्हाण (वय ३८) याची पत्नी भारतीबाई (३०) गणेश ( ६) व आरोही (४) हे नेहमीप्रमाणे जेऊर रस्त्यावरील मळ्यातील वस्तीवरील आपल्या निवासस्थानी झोपी गेले. समाधान यांनी काल गुरुवारी जवळच असलेल्या जेऊर येथील मधुकर सांगळे यांच्याकडे कांदे भरण्यासाठी आपली मालवाहू रिक्षा नेली होती. त्यातील काही कांदे भरून झाले व ते घरी आले व आज त्यांना कालचे काम पूर्ण करायचे होते. रिक्षाचालक समाधान याला पहाटे पाच वाजेपासून सांगळे हे मालवाहुतुक करायची. म्हणून सारखा फोन करीत होते. मात्र समाधान फोन उचलत नव्हते म्हणून सकाळी मधुकर सांगळे संधान यांच्या वस्तीवरच्या घरी आले व समोरचे दृश्य बघून ते घाबरले. कारण घरच्या ओसरीवर रक्तबंबाळ अवस्थेत सगळे कटूंबच निपचित अवस्थेत दिसले म्हणून ते लगेचच जेऊरला परतले. त्यांनी सरपंच राजूभाऊ बोडके यांना ही बाब कळविली. बोडके यांनी वाखारीचे पोलीस पाटील चव्हाण यांचे पती राकेश चव्हाण यांना कळविले व हे सर्व पुन्हा घटना स्थळी आले त्यांनी नांदगाव-मालेगाव पोलिसांना ही बाब लगेचच कळविली.

> ब्रेकिंग : नांदगाव हादरले…एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

नांदगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांचे पोलीस तातडीने दाखल झाले. शिवाय मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे हेही तातडीने दाखल झाले आहेत. त्यांनी तपासाच्या दृष्टीने परिसराची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्यात. नाशिकहून श्वान पथक दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे.

: दुर्दैवी! खर्च करूनही हाती काहीच नाही; विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अखेर हिम्मत सुटलीच

घटनेबद्दल हळहळ व्यक्त
छोट्याश्या वस्तीवर एकाच कुटूंबातील चौघांची निर्घृण हत्या झाल्याचे वृत्त कळताच वाखारी जेऊर साकोरी पाथर्डे आदी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी घटनस्थळी धाव घेतली व या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत होती.

anews Banner

Leave A Comment