• Home
  • दहीवड ग्रामपंचायतीने घेतला निर्णय : खलील प्रमाणे राहणार मजुरांची मजुरीचा दर*

दहीवड ग्रामपंचायतीने घेतला निर्णय : खलील प्रमाणे राहणार मजुरांची मजुरीचा दर*

*दहीवड ग्रामपंचायतीने घेतला निर्णय : खलील प्रमाणे राहणार मजुरांची मजुरीचा दर*✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)
आज शुक्रवार दि. ०७/०८/२०२० रोजी दहिवड ता.देवळा जि.नाशिक येथे नैर्सगिक,सामाजिक तसेच शेतमालास कवडीमोल बाजारभावा मुळे मेताकुटीस आलेल्या बळीराजांची मिटींग घेऊन शेतमजुरांच्या मजुरी संदर्भात निर्णय घेण्यात आला.

खालील प्रमाणे मजुरी दराचा ठराव पारीत करण्यात आला.
कांदा लागवड,निंदणी,खुरपणी प्रती माणसी रोज रू.२००,
बाजरी खुडणे प्रति माणसी रोजरू.२५०,
बाजरी कापणी प्रति माणसी रोज रू. ३००

याव्यतिरीक्त कोणी शेतकरी जास्त मजुरी मजुरांना देत असल्याचे आढळल्यास सदर शेतक-यांस हनुमान मंदिर पारावर बोलाऊन रूपये ५००० हजार दंड आकारण्यात येईल,असाही निर्णय घेण्यात आला.

सदर सभेला उपस्थिती: सरपंच आदिनाथ ठाकुर,माजी पोलीस पाटील मधूकर शिंदे,पोलीस पाटील रविंद्र शिवाजी सोनवणे,प्रहार शेतकरी संघटना देवळा तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर,प्रदिप देवरे,जिभाऊ देवरे,बळीराम सोनवणे,माणिक केदा,पुंजाराम गबा,जिभाऊ निकम,राजाराम शंकर,संतोष चिला,दिलीप शिवाजी,गोविंद हौशीराम,कौतीक वेडू,शांताराम दत्तू,रमन संतोष,श्रावण रामभाऊ,मधूकर अलई यांसह असंख्य शेतकरी हजर होते.

anews Banner

Leave A Comment