Home अमरावती अमरावती शहरात दोन दिवसांमध्ये डेंगूचे ९ पॉझिटिव्ह रुग्ण: जिल्ह्यात ९ महिन्यात एकूण...

अमरावती शहरात दोन दिवसांमध्ये डेंगूचे ९ पॉझिटिव्ह रुग्ण: जिल्ह्यात ९ महिन्यात एकूण २५१ पॉझिटिव्ह रुग्ण.

32
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231010-063452_WhatsApp.jpg

अमरावती शहरात दोन दिवसांमध्ये डेंगूचे ९ पॉझिटिव्ह रुग्ण: जिल्ह्यात ९ महिन्यात एकूण २५१ पॉझिटिव्ह रुग्ण.
——————————–दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
अमरावती . ब्युरो चीफ रिपोर्टर.
पी.एन.देशमुख..
अमरावती.
शहरात डेंगू चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, दोन दिवसात ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच अनेकांचा अहवाल यायचा बाकी आहे. मागील नऊ महिन्यात जिल्ह्यात १५१ डेंगू चे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत तापाचे लक्षण आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचे आव्हान केलेले आहे. शहरासह जिल्हा सर्दी खोकलाचे रुग्ण वाढत असून, काही रुग्णांचा तापच उतरत नसल्याने त्यांना डॉक्टरांकडे नेल्यानंतर त्यांची डेंगू चाचणी केल्या जात आहे. याच अनुषंगाने शहरात मागील काही दिवसापासून स्वच्छता, धुवारणी, फवारणी होत नसल्याचे ओरड वाढल्यामुळे मनपा आयुक्त सह सहाय्यक आयुक्त, स्वच्छताअधिकारी व आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर आली असून, शहरातील विविध भागात भेटी देत तेथील परिस्थिती पाहणी करत आहे. शहराच्या ज्या भागात डेंगूचे रुग्ण आढळले तेथे धुवारणी, फवारणी केली जात आहे. ज्यामुळे पाण्यावरील डासांचे निर्मूलन होईल.मनपाने डेंगूच्या डासाची उत्पत्ती होऊ नये म्हणून पाण्याच्या साठ्यामध्ये गप्पी मासे सोडण्यासोबतच फवारणी केली होती. तसेच नागरिकांना कोरडा दिवस पाडण्याचे आवाहन केले होते. परंतु, डेंगू च्या रुग्णांची वाढती संख्या बघून जनजागृती यंत्रणा कमी पडत आहे, की काय असे वाटते वाटत आहे. मनपाच्या शहरी आरोग्य केंद्रासह जिल्हा सामान्य रुग्णालय सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. शहरातील काही भागात तपासणी डेंगू रुग्णांची पॉझिटिव्ह आढळलेले आहे. शहरातील शहादा नगर, बडनेरा, जवाहर नगर प्रशांत नगर, मोर बाग, मशान गंज सह अन्य दोन भागात दोन दिवसात डेंगू चे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने द्वारे देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here