Home अमरावती पोलीस ठाण्यात तक्रार देतो म्हणून उकळले १४ लाख रुपये, महिलेसह दोघांविरुद्ध खंडीणीचा...

पोलीस ठाण्यात तक्रार देतो म्हणून उकळले १४ लाख रुपये, महिलेसह दोघांविरुद्ध खंडीणीचा गुन्हा दाखल, स्टॅम्प पेपर खाल्ला व दोन लाख रुपये लांबवीले.

44
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231010-062937_WhatsApp.jpg

पोलीस ठाण्यात तक्रार देतो म्हणून उकळले १४ लाख रुपये, महिलेसह दोघांविरुद्ध खंडीणीचा गुन्हा दाखल, स्टॅम्प पेपर खाल्ला व दोन लाख रुपये लांबवीले.
——————————-
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
अमरावतीजिल्हा.ब्युरो
चीफ रिपोर्टर.
पी एन देशमुख.
अमरावती.
पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊन अमरावती येथील एका व्यक्तीकडून १२.६० लाख रुपये उधडण्यात आले. ती महिला तेवढ्यावरच न थांबता की त्यांच्याकडून २ लाख ९ हजार ५०० रुपये रोख, आधार व पॅन कार्ड घेऊन पोबारा ऑक्टोंबर पूर्वी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी ओंकार नामक फिर्यादीच्या तक्रारीवरून ५ ऑक्टोंबर रोजी एक महिला व तिच्या नातेवाईक विरुद्ध खंडणी, मारहान, धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी ओंकार नामक व्यक्तीची आरोपी महिलेसोबत एक वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी व फिर्यादी हे एकमेकांना भेटत होते. ती फिर्यादी यांच्या कार्यालयात येत होती. आरोपी महिलेने वेळोवेळी फिर्यादी ओंकार यांना पैशाची मागणी केली. दिले नाही तर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देतो अशी धमकी दिली. त्यामुळे तिने यापूर्वी त्यांच्याकडून पाच लाख रुपये तसेच वेळोवेळी एकूण १२ लाख ६० हजार रुपये उकळले. दरम्यान ४ ऑक्टोंबर पूर्वी आरोपी महिलेने ओंकार यांना पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली होती. नाहीतर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देतो अशी धमकी दिली. दरम्यान, फिरयादीला तो ससेमीरा कायमचा टाळायचा होता. त्यामुळे दोन लाख रुपये घे व स्टॅम्पवर सही करून दे, यानंतर मला ब्लॅकमेलिंग करू नको, असे ओंकार यांनी तिला बजावले. दरम्यान चार ऑक्टोंबर पूर्वी ओंकार हे २ लाख रुपये व स्टॅम्प पेपर घेऊन राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी गेले. त्यावेळी महिला आरोपीने स्टॅम्प पेपर फाडला तसेच ओमकार यांच्या दूर चाकी च्या दिशेतील दोन लाख रुपये, ९५०० रुपया रोख असलेले वाॅलेट, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड असे महत्त्वाचे कागदपत्र घेऊन ती रफुचक्कर झाली .

Previous articleअमरावतीहुन मुंबईला तस्करी होणार १०८ किलो गांजा जप्त. सीपीच्या सीआय यु ची कारवाई.
Next articleअमरावती शहरात दोन दिवसांमध्ये डेंगूचे ९ पॉझिटिव्ह रुग्ण: जिल्ह्यात ९ महिन्यात एकूण २५१ पॉझिटिव्ह रुग्ण.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here