आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
आदिवासी बांधव एकवटले, चक्का जाम आंदोलन व मोर्चा
आदिवासी जमातीत धनगर समाजाला सामावून घेऊ देणार नाही
सुरज गुंडमवार ब्युरो चिफ युवा मराठा न्युज नेटवर्क गडचिरोली
गडचिरोली: आदिवासी जमातीत धनगर समाजाला समाविष्ठ करणार या मुख्यमंत्र्याच्या घोषणाच्या विरोधात आदिवासी बांधव एकवटले. दिं 1 ऑक्टोबर ला इंदिरा गांधी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.व मोर्चा काढण्यात आला़, नंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.यात आदिवासी नेते कुणाल कोवे गोगपाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत मडावी,क्रांती पुराम,नितिन पदा,प्रवेश गावंडे,बादल मडावी,दिलिप घोडाम,उमेश उईके,दिनेश मडावी,मालता पुडो आदिचे भाषणे झालीत यात राज्य सरकार चा निषेध नोंदविण्यात आला.महाराष्ट्रातील आदिवासी जमातीमध्ये धनगर समाजाला समाविष्ठ करु नये.खाजगीकरण कंञाटिकण GR रद्द करावा. तलाटी भरती पेसा अंतर्गत करावे, वनरक्षक कायदा 2023 रद्द करावा, खर्या आदिवासीच्या नोकर्या बोगस आदिवासीनी बळकविणार्याना नौकरीतून बडतफ करावे.आदि मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्यात आले. मोर्चात आदिवासी संघटना ग्रामसभा व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






