Home कोकण जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे गावची कु.श्वेता गमरे प्रथम.! 🛑

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे गावची कु.श्वेता गमरे प्रथम.! 🛑

117
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे गावची कु.श्वेता गमरे प्रथम.! 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

संगमेश्वर/रत्नागिरी ⭕गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा आयोजित जिल्हास्तरीय छत्रपती संभाजी महाराज निबंध स्पर्धा – २०२०-०२१,पत्रकार व गाव विकास समितीचे प्रमुख मार्गदर्शक सुहास खंडागळे यांच्या संकल्पनेतून तसेच गा.वि.समितीचे अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे यांसह गाव विकास समिती परिवाराच्या सहकार्याने ही नियोजित यशस्वीपणे पार पडलेली स्पर्धा होती. जिल्हास्तरीय आयोजन असणाऱ्या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेतील अंतिम विजेती मु.पो.पिरंदवणे ( ता. संगमेश्वर, जि रत्नागिरी ) गावची सुकन्या कु.श्वेता संतोष गमरे हिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन नुकतंच दि.०५ एप्रिल २०२१ रोजी सन्मानित करण्यात आले.अतिशय गरीब कुटुंबातील कौटुंबिक परिस्थितीचा संघर्ष करून श्वेता तृतीय वर्ष कला शाखा मधून आपलं शिक्षण पूर्ण करत आहे.लहानपणीच शालेय उपक्रमात सहभाग घेणं, ही आवड असल्याने आजवर अनेक निबंध, वक्तृत्व स्पर्धेत श्वेताने भरभरून यश संपादन केले आहे. नुकत्याच श्री पाणबुडी देवी कलामंच आयोजित भव्य ऑनलाईन निबंध स्पर्धेत देखील श्वेताला दुसरा क्रमांक मिळाला होता.गाव विकास समिती आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या श्वेता गमरे हीच पंचक्रोशीतुन अभिनंदनासह कौतुक होत आहे.⭕

Previous articleशिवसंग्राम संघटनेच्या दक्षिण मुंबई महिला अध्यक्ष पदी सौ. प्राची कदम यांची निवड
Next articleबागलाणला रेमडीसिव्हीरचा तुटवडा; पुरवठा सुरळीत करण्याची माजी आमदार संजय चव्हाण यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here