Home माझं गाव माझं गा-हाणं बागलाणला रेमडीसिव्हीरचा तुटवडा; पुरवठा सुरळीत करण्याची माजी आमदार संजय चव्हाण यांची जिल्हाधिकार्‍यांकडे...

बागलाणला रेमडीसिव्हीरचा तुटवडा; पुरवठा सुरळीत करण्याची माजी आमदार संजय चव्हाण यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी….

173
0

राजेंद्र पाटील राऊत

बागलाणला रेमडीसिव्हीरचा तुटवडा; पुरवठा सुरळीत करण्याची माजी आमदार संजय चव्हाण यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी….
सटाणा:(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
प्रतिनिधी!- बागलाण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या रोजच झपाट्याने वाढत आहे सध्या बागलाण मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने हजारी गाठली आहे. तालुक्यात डांगसौंदाणे येथे कोव्हिडं सेंटर असुन नामपुर येथे ही तात्काळ कोव्हिडं सेंटर उभारून रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार संजय चव्हाण यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे केली आहे याबाबत आमदार चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करून बागलाण तालुक्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली आहे.

सध्या तालुक्यात हजारच्या आसपास ऍक्टिव्ह रुग्णसंख्या असून कोरोणाने संपूर्ण तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आपला विळखा घातला आहे.याही परिस्थितीत रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी नामपूर येथे कोव्हिडं केअर सेंटर तात्काळ सुरू करावे व ऑक्सीजन सिलेंडर चा होणारा तुटवडा दूर करावा तालुक्यात रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा गरजेनुसार पाठपुरावा करण्यात यावा रेमडिसिव्हीरचा होणारा काळाबाजार तात्काळ थांबवून कोरोना रुग्णांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आजच सर्व वितरकांना सूचना करण्यात आल्या असल्याचे सांगत ऑक्सीजन सिलेंडरचा ही पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती दिली आहे. नामुपरचे कोव्हिडं सेंटर हे तात्काळ सुरू करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असून लवकरच सुसज्ज कोव्हिडं केयर सेंटर कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहीती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी माजी आमदार संजय चव्हाण यांना दिली आहे. आपण या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ही मागणी केली आहे. ना.भुजबळ यांच्या सूचनेनुसार लवकरच नामपूर कोव्हिडं सेंटर येथे 30 बेडचे कोव्हिड सेंटर सुरू होत असल्याची ही माहिती मा. आमदार संजय चव्हाण यांनी दिली आहे.

Previous articleजिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे गावची कु.श्वेता गमरे प्रथम.! 🛑
Next articleखमताणे शिवारातील टरबुज काश्मिर मंडईकडे रवाना…         
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here