• Home
  • *शेतकरी आईबापाच्या कष्टाचे मुलाने* *फेडले पांग.*

*शेतकरी आईबापाच्या कष्टाचे मुलाने* *फेडले पांग.*

*शेतकरी आईबापाच्या कष्टाचे मुलाने* *फेडले पांग.*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)

पोरगा कलेक्टर झाल्याचे कळले तेव्हा आई शेतात खुरपत होती शेतकरी आईबापाच्या कष्टाचे मुलाने फेडले पांग
बेताच्या परिस्थितीत शिकून अधिकारी होणं काय असतं हे एक यशस्वी विद्यार्थींच जाणु शकतो. आज केंद्रिय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०१९ चे निकाल जाहीर केले आहेत. केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत श्रीकांत खांडेकर यांनी २३१ क्रमांकाची रँक मिळवली आहे.
श्रीकांत खांडेकर हे कलेक्टर झाले त्यावेळी त्यांची आई शेतात खुरपण करत होत्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात 231व्या क्रमांकावर आलेल्या श्रीकांत खांडेकरच्या उच्च शिक्षणासाठी निरक्षर असलेल्या कष्ट करत वडीलांनी तीन एकर जमीन मुलाच्या शिक्षणासाठी विकली आणि प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलाचे शिक्षणावर खर्च केले.
आणि वडिलांच्या याच कष्टाची जाणीव ठेवत अखेर मुलाने कलेक्टर बणण्याचे ध्येय पूर्ण केले. दुष्काळी तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या बावची ता.मंगळवेढा जि.सोलापूर गावात जिरायत शेतीत केलेला खर्च परवडत नसल्याने मोलमजुरी करुन जगणाऱ्या बावची गावातील कुंडलिक खांडेकर यांनी आपल्या तीन मुलांना स्वतः अशिक्षित राहून शिक्षीत केले.
वडिलांच्या कष्टाचे फळ म्हणुन आज थोरला मुलगा मार्केटींगच्या माध्यमातून रोजगार मिळवित आहे. आणि दुसरा श्रीकांत लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झाला. तिसऱ्या मुलाचे पदवीचे शिक्षण सुरु आहे.
श्रीकांत यांचे प्राथमिक शिक्षण
बावचीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झाल्यानंतर निंबोणी इंग्लीश स्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविदयातून बारावी विज्ञान शिक्षण झाल्यानंतर दापोलीच्या कृषी विदयापीठात कृषी अभियांत्रीकीचे शिक्षण घेतले.
अभियांत्रिकीचे आयआयटीत निवड झालेली सोडून केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुणे येथे 1 वर्षे तयारी नवी दिल्लीत सहा महिन्यापासून तयारी सुरु केली पहिल्याच प्रयत्नात वनसेवा परिक्षेत देशात 33 वा क्रमांक व महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविला.
10वी पर्यंत मराठी माध्यमानंतर 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश सुरुवातीला इंग्रजी विषयाशी संघर्ष करावा लागला पण परिस्थितीची जाणीव आई वडीलांनी जाणवू दिली नसल्याने लोकसेवा आयोगात चांगले करिअर करता आले. आपल्या या यशाबददल बोलताना श्रीकांत म्हणाला की, ‘शहरी भागातील मुलाच्या परिस्थितीशी तुलना न करता आपले ध्येय समोर ठेवून तयारी केल्यास यश मिळू शकते.
आज लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर होताच बावची गावावर आनंदाचे वातावरण पसरले असून वडील आजारी असल्यामुळे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेले. स्वतःजवळ मोबाईल नसल्यामुळे दवाखान्यात फोन करून मुलगा कलेक्टर झाल्याचे नातेवाईकांनी कळवले.
आई शेतातच कष्ट करत असल्याचे आढळून आली. त्यामुळे मुलगा कलेक्टर झाला असेल. पण, त्यांनी आपल्या कष्ट सोडले नाही.
श्रीकांतच्या आई कमल खांडेकर म्हणाल्या, मुलांच्या यशाने आमचे कुटूंब सुखी झाले अजुनही कष्ट करत असून शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज आजही भरतोय कष्ट करतोय कुणाशी लबाडी केली नसल्याने मुलाने सार्थकी लावले. परीक्षेतील कशा प्रमाणे प्रशासनातील कामात देखील आपला ठसा उमटवावा गोरगरिबांची सेवा करावी एवढीच अपेक्षा आहे.

anews Banner

Leave A Comment