• Home
  • *आधिच पगार कमी* *त्यात बँकेची मनमानी.*

*आधिच पगार कमी* *त्यात बँकेची मनमानी.*

*आधिच पगार कमी*
*त्यात बँकेची मनमानी.*

*नियमबाह्य वसुली केलेले व्याज* *माफ करा.*

कोल्हापूर प्रतिनीधी (ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)

एसटी.कामगारांने जगायच कसं
बँकेने नियमबाह्य वसुली केलेल व्याज माफ करायला पाहिजे नाहीतर
तिव्र आंदोलनाचा कामगार सेनेने इशारा दिला आहे.
कोविड-19 च्या जागतिक महामारीत आर बी आय च्या सूचनांचे उलंघन करुन स्टेट ट्रांन्सपोर्ट को-ऑप. बँक लि. मुंबई च्या संचालक मंडळाने बँकेच्या कर्जदारांचे कर्जाचे हप्ते वसुल न करण्याबाबत तसेच कर्जाचा कालावधी वाढुन मिळणेबाबत लेखी संमती न घेताच संचालक मंडळाने परस्पर कर्जाचे हप्ते वसुलीला सहा महिन्यासाठी स्थगित केले असुन पैकी तीन महिन्याचे कर्जावरील व्याज नियमबाह्य वसुल केले आहेत. स्थगित कालावधीचा हप्ता वसुली सहा महिन्यासाठी पुढे ढकलण्यात येणार असुन या कालावधीचा व्याज मात्र वसुल करण्यात येणार आहे त्यामुळे एसटी बँक कर्जदारांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
एसटी को-ऑप बँकेच्या संचालक मंडळाने RBI च्या नियमाचे उलंघन केल्यामुळे कर्जदाराचे वसुल करण्यात येणारे तीन महिन्याचे व्याज माफ करावे अन्यथा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेतर्फे तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस मा हिरेनजी रेडकर साहेब यांनी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष एसटी को-ऑप. बँक लि मुंबई यांना पत्राद्वारे दिला आहे…..

anews Banner

Leave A Comment