• Home
  • 🛑 कोकणची सुकन्या नेहा प्रकाश भोसले….! महाराष्ट्रात युपीएससी परीक्षेत पहिली 🛑

🛑 कोकणची सुकन्या नेहा प्रकाश भोसले….! महाराष्ट्रात युपीएससी परीक्षेत पहिली 🛑

🛑 कोकणची सुकन्या नेहा प्रकाश भोसले….! महाराष्ट्रात युपीएससी परीक्षेत पहिली 🛑
✍️रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड/खोपी :⭕कोकणची सुकन्या खेड तालुक्यातील खोपी गावची मुलगी आयएएस अधिकारी यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात पहिली आली..

अभिमानास्पद यश.कोकणातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी
भविष्यात जास्तीत जास्त कोकणातील युवक-युवती यूपीएससी, एमपीएससी परीक्षेत बसतील पास होतील अधिकारी हे कोकण विकासाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे…

कै. गोविंदराव बा भोसले गाव खोपी यांनी मुंबईस्थित निवडक मंडळींना हाताशी धरून छत्रपती शिवाजी विद्याप्रसारक मंडळाची स्थापना करून या संस्थेच्या वतीने मोठ्या अथक प्रयत्नाने खोपी गावात छत्रपती शिवाजी हायस्कूल सुरू केले. यामुळे सातगाव संस्थानातील शेतकरी कष्टकरी व सैनिकांच्या मुलांना माध्यमिक शिक्षण घेता आले. हे सातगाव संस्थानातील पाहिले हायस्कूल .

कै. गोविंदराव हे पेशाने शिक्षक , योगायोग पाहा ज्यांनी या गावात माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्याच नातीने , कु. नेहा प्रकाशराव भोसले ही UPSC परीक्षेत महाराष्ट्रात पहिला व देशात १५ वा नंबर पटकावून घवघवीत यश मिळवून उतिर्ण झाली . कु. नेहा यांनी खोपी सह सातगावाचे नाव उज्वल करून त्यावर मानाचा तुरा रोविला.

अगदी मनापासून आनंद झाला.
सातगावातील येणाऱ्या पुढच्या तरूणांपुढे एक आदर्श निर्माण झाला.

गोवींदराव बा भोसले यां दादांचे याच साठी आभार ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व त्या काळी ओळखून सातगाव समाजासाठी शाळेची स्थापना केली .

त्यांच्या कामाचे सार्थक होऊन त्यांच्या नातीने *कु नेहा प्रकाशराव भोसले* हीने मेहनत आणी आपल्या बुद्धिमत्तेने देशात UPSC मधे घवघवीत यश मिळवले व राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

नेहाताई तुला खुप खुप शुभेच्छा
ग्राम देवता आई श्रीरामवरदायनी, राजमाता जिजाऊंचे आशिर्वाद आपल्या पाठी कायम राहोत.

सन्मानीय श्री प्रकाशराव दादा या उभयतांचे खुप खुप अभिनंदन आपल्या पोटी पुढील येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारा लखलखता तारा जन्माला आला….⭕

anews Banner

Leave A Comment