• Home
  • 🛑❗बबडया खरंच सुधारला आहे….! महाराष्ट्र पोलिसांनी भन्नाट ट्विट ❗

🛑❗बबडया खरंच सुधारला आहे….! महाराष्ट्र पोलिसांनी भन्नाट ट्विट ❗

🛑❗बबडया खरंच सुधारला आहे….! महाराष्ट्र पोलिसांनी भन्नाट ट्विट ❗🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील बबड्या हे पात्र चांगलच गाजलं आहे. अभिनेता आशुतोष पत्की हा सोहम उर्फ ‘बबड्या’ची भूमिका साकारत आहे. बबड्या हे पात्र नकारात्मक दाखवण्यात असले तरी महाराष्ट्र पोलिसांनी सोहम उर्फ ‘बबड्या’ खरंच सुधारला आहे, असे म्हणत मास्क वापरा असा जागृती संदेश दिला आहे.

नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी अनेकवेळा महाराष्ट्र पोलिसांनी भन्नाट कल्पना वापरल्या आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस ट्विटरच्या माध्यमातून लोकांना सुरक्षेच्या नियमांबद्दल जागरुक करत आहेत. यासाठी त्यांनी यावेळी बबड्याची मदत घेतली आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी बबड्याचा मास्क घातलेला फोटो ट्विट करत म्हटले आहे की, ‘कथानकात ‘ट्विस्ट’ आहे! बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे’. या ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना मास्क वापरा असे आवाहन केले आहे.

यासोबतच बबड्याचा मास्क घातलेल्या फोटोवर ”बबड्या मास्क लावतो, बबड्या खरंच सुधारला आहे” अशी सूचक ओळ लिहिली आहे….⭕

anews Banner

Leave A Comment