• Home
  • 🛑 मोबाईल बनवणारी सर्वात मोठी कंपनी….! व्यवसायकरण्यासाठी भारतात स्थलांतरीत करण्याच्या तयारीत 🛑

🛑 मोबाईल बनवणारी सर्वात मोठी कंपनी….! व्यवसायकरण्यासाठी भारतात स्थलांतरीत करण्याच्या तयारीत 🛑

🛑 मोबाईल बनवणारी सर्वात मोठी कंपनी….! व्यवसायकरण्यासाठी भारतात स्थलांतरीत करण्याच्या तयारीत 🛑
✍️ नवी दिल्ली:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕दक्षिण कोरियातील मोबाईल बनवणारी कंपनी सॅमसंग लवकरच त्यांचा व्हिएतनाममधील सर्व व्यवसाय भारतात स्थलांतर करणार आहे. माध्यमांच्या एका अहवालानुसार पुढील पाच वर्षात सॅमसंग कंपनी भारतात ३.७ लाख कोटी रुपयांचे मोबाईल फोन उत्पादन करण्याची योजना बनवली आहे. या अंतर्गत भारतात १२ लाख नवे रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सॅमसंग आणि आयटी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एका नव्या योजनेबाबत चर्चा झाली. पीटीआय वृत्त संस्थेच्या माहितीनुसार प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटीव्ह स्कीम (पीएलआय) योजनेअंतर्गत कंपनी भारतात स्मार्टफोन बनवण्याची योजना आहे.

सरकारने या योजनेची घोषणा एप्रिल महिन्यात केली होती.

जगातील सर्वात मोठा सॅमसंगचा फोन उत्पादन कारखाना उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये आहे. सॅमसंग व्हिएतनाममध्ये ५० टक्के मोबाईल फोन बनवते. रिसर्च फर्म इंटरनॅशनल डेटा कॉर्पोशन (आयडीसी) संस्थेच्या माहितीनुसार एप्रिल ते मे या तिमाहीत भारतातील बाजारात सॅमसंग फोनचा हिस्सा २४ टक्के आहे.

केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादन क्षमतेला चालना देण्यासाठी Scheme for Production of Manufacturing of Electronic Component End Semiconductors (SPECS), Modified Electronics Manufacturing Clusters (EMC 2.0) आणि Production Linked Incentives Scheme (PLI) या तीन योजना आणल्या आहे.⭕

anews Banner

Leave A Comment