• Home
  • *शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व*

*शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व*

*शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर मधील छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या फिजिक्स विभागातील 2002 च्या बॅच मधील माजी. विद्यार्थ्यांनी विद्यापीठासमोर चहाची टपरी चालविणाऱ्या शुभांगी पाटील यांची नात व धनश्री यांच्या शिक्षणासाठी 18 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
शिवाजी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने गेट क्रमांक दोन समोरील अमर पाटील यांच्या टपरी वरील चहाचा आस्वाद घेतलाच आहे. परंतु पती व नंतर मुलगा अमर यांच्या आकस्मित निधनानंतर शुभांगी पाटील यांनी आपली सून वैष्णवी हिच्या मदतीने चहाचा गाडा हिमतीने पुढे चालू ठेवला व आपल्या नाती सिमरन व धनश्री यांच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहिले.
कोरोना महामारी च्या काळात लॉकडाऊन मुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे इंजिनिअरिंगला असणारी सिमरण व दहावीला असणारी धनश्री यांची शिक्षण सुरू ठेव त्यांना अडचणी जाणवू लागल्या.
जेव्हा त्यांच्या या अडचणी पेठवडगाव येथील श्री विजयसिंह यादव महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ सचिन पवार यांना समजली तेव्हा त्यांनी आपल्या २००२ च्या बॅच मधील मित्रांशी संपर्क साधला व सर्वांनी मिळून पाटील कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे ठरवले.
सर्वांनी आपल्या सामाजिक जाणिवेचे भान ठेवून आर्थिक मदत केली व अल्पावधीत अठरा हजार रुपये इतका निधी जमा झाला.
शिवाजी विद्यापीठाच्या फिजिक्स विभागातील २००२ च्या बॕचमधील डॉ.सचिन पवार, डॉ.सरफराज मुजावर, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.प्रदीप कांबळे, प्रा.विजय कोठावळे, डॉ.चिदानंद कनमाडी, प्रा मनिषा धुमाळ व त्यांच्या इतर सहकारी मित्रांनी धनादेश मुलीच्या शिक्षणासाठी पाटील मावशी व वहिनी यांच्या कडे सुपूर्द केला. यावेळी मावशी व वहिनी यांचे अश्रूत मात्र संघर्ष दिसत होता. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी डॉ. प्रविण कोडोलीकर व मंदार पाटील उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment