Home Breaking News *ताराराणी प्राधान्य कार्डधारकांना रांगेत न थांबवता प्रथम प्राधान्य द्यावे*

*ताराराणी प्राधान्य कार्डधारकांना रांगेत न थांबवता प्रथम प्राधान्य द्यावे*

100
0

*ताराराणी प्राधान्य कार्डधारकांना रांगेत न थांबवता प्रथम प्राधान्य द्यावे*

*युवा मराठा न्यूज नेटवर्क*

कोल्हापूर जिल्ह्यातील
ताराराणी प्राधान्य कार्डधारक दाम्पत्यांना शासकीय, निमशासकीय कार्यालयात सेवा देताना त्यांना रांगेमध्ये न थांबवता प्रथम प्राधान्य द्यावे, असे निर्देश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री.दौलत देसाई यांनी दिले.
जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी
“बेटी बचाओ बेटी पढाओ”
योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत मागील पाच वर्षांत 1 व 2 मुलीनंतर कुटुंब शस्त्रक्रिया केलेल्या पालकांना व मुलींना सन्मानीत करण्यासाठी “ताराराणी प्राधान्य कार्ड” देण्यात आले आहे. महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ताराराणी प्राधान्य कार्ड वितरण करण्यात आले आहे.
ताराराणी प्राधान्य कार्ड असलेल्या दाम्पत्यांना शासकीय, निमशासकीय कार्यालये, घरफाळा, पाणी बील, वीज बील, सरकारी, खासगी दवाखाने, राष्ट्रीयकृत, नागरी, सहकारी, खासगी बँकातील सर्व व्यवहार, रेल्वे तिकीट/आरक्षण, पोस्टामधील योजनेचे पेमेंट, गॅस नोंदणी/वितरण, एसटी तिकीट/आरक्षण, रेशन दुकाने, सब पोस्ट कार्यालये, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सिनेमा गृहे इत्यादी ठिकाणी आलेल्या ताराराणी प्राधान्यकार्ड धारक दाम्पत्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
ताराराणी प्राधान्य कार्ड दाम्पत्यांना रांगेत उभे केल्याबाबत तक्रार येणार नाही याची खबरदारी संबंधित कार्यालयाने घ्यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी म्हटले आहे.

Previous article
Next article*शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here