Home Breaking News मुखेड हद्दीतील रस्ता “मौत का कुवा”

मुखेड हद्दीतील रस्ता “मौत का कुवा”

213

जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा )देगलूर या राष्ट्रीय महामार्गावरील रावणकोळा ते मुक्रमाबाद या रस्त्याची दुरावस्था शब्दात व्यक्त करता येणार नाही,यवढी वाईट झाली आहे. *दरवेळी थातुरमातुर दुरुस्ती करून मोकळे व्हायचे,यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.* याच रस्त्याची उदगीर हद्दीतील दुरुस्ती दर्जेदार आहे.मात्र,मुखेड हद्दीतील रस्ता “मौत का कुवा” झाला आहे. *लोकप्रतिनिधीचे याकडे होणारे दुर्लक्ष संतापजनक आहे.* रावणकोळा ते मुक्रमाबाद रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे.ही दुरुस्ती यावेळीपण थातुरमातुर केली जात आहे.हे आता यावेळी सहन केले जाणार नाही.रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी लागेल,अन्यथा रस्ता रोको आंदोलन करू,असे निवेदन राष्ट्रीय महामार्ग नांदेड विगाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाला दिले आहे.
*—————————*
शिवशंकर पाटील कलंबरकर

Previous article*शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व*
Next articleसाहेब माझं पोरग कुठे आहे आई चा बांध तुटला टाहो फुटला आश्रुंचा पुर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.