• Home
  • साहेब माझं पोरग कुठे आहे आई चा बांध तुटला टाहो फुटला आश्रुंचा पुर

साहेब माझं पोरग कुठे आहे आई चा बांध तुटला टाहो फुटला आश्रुंचा पुर

पुणे १८ ऑक्टोबर⭕ (युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)⭕
पुणे_ साहेब माझं पोरग कुठे आहे आई चा बांध तुटला टाहो फुटला आश्रुंचा पुर

मुठेच्या प्रवहात मुले पडली व पालकांचा हाबरडा फुटला.
आई साहेब माझं पोरग कुठे आहे.
,,, इथेच आहे तुम्ही थोडा धिर धरा शांत व्हा.
,, कुठे आहे दाखवा मला माझ्या पोराचे तोंड साहेब
असे विचारत या माय माउलींने हंबरडा फोडला.
कुणाला तरी बोलवा माझ्या पोराला वाचवा ओ साहेब ताई कुणी आहे का माझ्या पोराला वाचवायला . देवा पांडुरंगा.
या माय माऊली च्या विनवण्या ऐकून पोलीस कर्मचारी शिपाई यांना सुद्धा अश्रू अनावर झाले .
या अवघड प्रसंगी प्रत्येक जण एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते.
ताडीवाला रोड वर शुक्रवारी दिं १६ सायंकाळी भिडे पुलाजवळ फोटोसेशन करत असताना दोन मुले पाण्यात पडली. त्यावेळी त्यांच्या बरोबर असणाऱ्या मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरड सुरू केला मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे.
काही अंतरावरच मुली दिसेना अशी झाली.

घाबरलेल्या मित्रांनी तात्काळ अग्निशामक सहपोलीस व कुटुंबाला माहिती दिली.
व तात्काळ पोलीस प्रशासन अग्निशामक दाखल झाली. वृद्धेश्वर सिद्धेश्वर याठिकाणी जाळी लावण्यात आली.
मात्र उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. आपली मुलं पाण्यात पडली हे समजल्यानंतर कुटुंबासह ताडी वाला रोड ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
साहेब आमची पोर कुठे आहेत अशी विचारणा करतात मित्रांनी मावशी तुमचा मुलगा माझा मित्र पाण्यात बुडाला असे ऐकताच आईने हंबरडा फोडला.
मुठे च्या काठावर हुंदक्यांचा आवाज येत होता.

anews Banner

Leave A Comment