Home सामाजिक भूमिहीन शेतमजुराचा मुलगा ते आरोग्य उपसंचालक या पदापर्यंत प्रवास…

भूमिहीन शेतमजुराचा मुलगा ते आरोग्य उपसंचालक या पदापर्यंत प्रवास…

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20230127-WA0009.jpg

भूमिहीन शेतमजुराचा मुलगा ते आरोग्य उपसंचालक या पदापर्यंत प्रवास…
शब्दांकन :- भास्कर जी देवरे (विभागीय संपादक युवा मराठा न्यूज नेटवर्क)

भूमीहिन शेतमजूर कुटुंब असल्याने ऊसतोड, विहिरी खोदकाम करणे, रोजगार हमी योजनेचे काम करत करत पोटापाण्यासाठी स्थलांतर करणारे कुटुंबातील एक मुलगा कुटुंबात कोणत्या शिक्षणाचा वारसा नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने उच्च पदापर्यंत पोहोचतो त्याचा हा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास…
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ढोकरी (अंबिकानगर ठाकरवाडी) या गावात भूमिहीन, अशिक्षित, निरक्षर, शिक्षणाचा कोणताही वारसा नसलेले शेतमजुराच्या घरी जन्मलेल्या डॉक्टर यांचा जीवन प्रवास. डॉ. पी. डी. गांडाळ सर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बीजे मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटल पुणे येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यानंतर सेवेअंतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिबंधात्मक सामाजिक औषधशास्त्र या विभागातील पदव्युत्तर शिक्षण डॉक्टर पी एम मेडिकल कॉलेज, शिवाजी विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी पूर्ण केले.
ग्रामीण भागातील अशिक्षित कुटुंबात जरी जन्म झाला तरीसुद्धा शिक्षणाबद्दल कोणतीही भीती व न्यूनगंड न बाळगता अभ्यास करून यश सहज मिळत नाही हे लक्षात ठेवून आपली इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर डॉ.पी.डी.गांडाळ सर यांनी यश मिळवता येते हे सिद्ध करून दाखवले. आपली इच्छा शक्ती आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर अपयशाला घाबरण्याची काहीच कारण नाही, कारण या जगात अशक्य असे काहीच नाही अशी डॉ पी डी गांडाळ सर यांची धारणा आहे.

उल्लेखनीय कार्य

डॉ. पी. डी. गांडाळ सर हे अत्यंत कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि तितकेच लोकाभिमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून आरोग्य सेवा संचालनाच्या नाशिक मंडळात लोकप्रिय आहेत. अधिकाऱ्यांना त्यांनी नेहमीच प्रेमाने कर्तव्य निष्ठा बजावण्याची सवय लावली. आरोग्य विभागात सेवा बजावताना त्यांनी विविध पदांवर यशस्वीरित्या काम केले आहे. डॉ. पी. डी. गांडाळ सर यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा परिषद धुळे तसेच साथरोग शास्त्रज्ञ, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक, सहाय्यक संचालक कुष्ठरोग, हिवताप, हत्तीरोग, जलजन्य आजार, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर या पदांवर उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा यासाठी असलेला कायाकल्प पुरस्कार सर्वाधिक अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना मिळून देण्यात सिंहाचा वाटा डॉ. पी. डी. गांडाळ सर यांचा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक आरोग्य संस्थांना कार्यकल्प पुरस्काराने गौरवण्यात आले होते आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमांमध्ये अव्वल स्थान मिळवले होते. तसेच माता मृत्यू दर व बालमृत्यू दर कमी करण्यात मोठे यश प्राप्त केलेले आहे. राज्यस्तरीय विविध प्रकारचे आरोग्य विषयक कार्यक्रमांचे प्रशिक्षण स्वतः पूर्ण केलेले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय स्तर प्रशिक्षक रोटरी क्लब नगर व चेलाराम इन्स्टिट्यूट पुणे यांचे सहकार्याने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सुद्धा पुरस्कार देण्यात आला आहे.

आज पर्यंत प्राप्त पुरस्कार

® महादेव कोळी मित्र मंडळ यांच्यातर्फे राघोजी भांगरे वैद्यकीय पुरस्कार,
® लोकरंजन प्रतिष्ठान अकोले यांच्यातर्फे अकोले गौरव पुरस्कार 2010 मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
® सरपंच सेवा संघ यांचा राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे
® सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी कोविड 19 या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे.
® राष्ट्रीय कीटकजन्य व जनजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत, अहमदनगर जिल्हा जागतिक हिवताप दिन 2019, उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
® आदिवासी ठाकर समाज दुर्बल घटक विकास संस्था, औरंगाबाद यांच्यातर्फे औरंगाबाद जिल्हा ठाकर समाजभूषण 2020 या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
® आदिवासी ठाकर समाज दुर्बल घटक विकास संस्था, ठाकरवाडी यांनी कृतज्ञता गौरव पुरस्कार प्रदान केलेला आहे.
® महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचा अहमदनगर जिल्हा आरोग्य मार्गदर्शिका आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आलेले होते.
® पंचायत समिती अकोले, जिल्हा अहमदनगर 1999 ते 2000 या वर्षात विशेष पल्स पोलिओ राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत प्रसंशनीय कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलेले आहे.
® ट्रायबल डॉक्टर्स फोरम आयोजित द्वितीय आदिवासी डॉक्टर्स विचार संमेलन 2018 सहभागाबद्दल स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आलेले आहे.
® सह्याद्री आदिवासी ठाकूर- ठाकर समाज उन्नती मंडळ, महाराष्ट्र राज्य, ता. मोखाडा, जिल्हा पालघर यांनी सोळाव्या वर्धापनदिनी 2021 मध्ये सन्मानित केलेले आहे.
® महाराष्ट्र शासन राष्ट्रीय कीटकजन्य व जलजन्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा अहमदनगर जागतिक हिवताप दिन 2018 सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
® मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नासिक रोड यांनी 2021 हॅपी डॉक्टर्स डे निमित्ताने चीफ गेस्ट म्हणून सन्मानित केलेले आहे.
® महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना राज्यस्तरीय अधिवेशन 2018 येथील सन्माननीय उपस्थितीबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलेले आहे.
® सह्याद्री आदिवासी ठाकूर ठाकूर समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य 17 वा वर्धापन दिन 2022 प्रमुख अतिथी सन्मानचिन्ह प्रदान केलेले आहे.
® ट्रायबल डॉक्टर्स फोरम आयोजित द्वितीय आदिवासी डॉक्टर्स विचार संमेलन 2018 सांगवी पुणे येथील उपस्थितीबद्दल स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले आहे.
® चेलाराम डायबिटीज इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत उत्कृष्ट समाजसेवा बद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे.
® राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2017 साठी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलेले आहे
® आदिवासी नोकर वर्ग ठाकूर व ठाकर समाज उत्कर्ष संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे निसर्ग वाशी ठका बाबा गांगड आदिवासी आदर्श अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आलेले आहे.
® स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांचा 2022 साठीचा राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार माननीय डॉ.पी.डी. गांडाळ सर यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
आज रोजी डॉ.पी.डी. गांडाळ सर. हे नोकरी निमित्ताने नाशिकला राहतात आणि त्यांचे कुटुंब मात्र अकोले तालुक्यातील उंचखडक खुर्द या गावी राहतात . पोटापाण्यासाठी स्थलांतरित झालेलं हे कुटुंबाचे चौथे गाव आहे. डॉ.पी.डी. गांडाळ सर यांच्या कुटुंबात 4 भाऊ व 2 निरक्षर विवाहित बहिणी असे सहा भावंड आहेत.एवढ्या मोठ्या पदावर अधिकारी असूनही आजही कुटुंबाकडे फक्त डोंगरालगत असलेली कोरडवाहू १ हेक्टर 55 आर. जमीन आहे
अशा कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकाऱ्यांची नासिक विभाग सहाय्यक संचालक हिवताप या पदावर कार्यरत असणारे डॉ.पी.डी. गांडाळ सर यांच्याकडे नुकताच आरोग्यसेवा उपसंचालक, आरोग्यसेवा नाशिक परिमंडळ या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. डॉक्टर गांडाळ सर यांच्या या नियुक्तीचे आरोग्यसेवा नाशिक मंडळातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले असून सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. डॉक्टर गांडाळ सर यांच्या या नियुक्तीने ते या पदाचीही शान वाढवतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आरोग्य उपसंचालक या पदावर त्यांची नियमित नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here