Home रत्नागिरी लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान स्मारकाचे त्वरित संवर्धन करण्याबाबत हिंदु जनजागृती समितीचे पुरातत्व विभागाला...

लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान स्मारकाचे त्वरित संवर्धन करण्याबाबत हिंदु जनजागृती समितीचे पुरातत्व विभागाला निवेदन

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0066.jpg

लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान स्मारकाचे त्वरित संवर्धन करण्याबाबत हिंदु जनजागृती समितीचे पुरातत्व विभागाला निवेदन

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) – थोर राष्ट्रपुरुष आणि स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या रत्नागिरी येथील जन्मभूमीचे त्वरित संरक्षण आणि संवर्धन करावे आणि ते ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीतर्फे नुकतेच साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, रत्नागिरी यांना देण्यात आले. विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. शांताराम केकडे यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनाची प्रत संचालक, पुरातत्व विभाग, महाराष्ट्र राज्य यांनाही पाठवण्यात आली आहे. या वेळी शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे श्री. देवेंद्र झापडेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री माणिकराव टापरे, चंद्रशेखर गुडेकर, संजय जोशी हे उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थान स्मारकाच्या दुरवस्थेची तातडीने दखल घेऊन त्वरित पावले उचलण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना स्मारकाच्या दुस्थितीचे आणि जतनविषयक सूत्रांचे सविस्तर निवेदन यापूर्वी देण्यात आले होते; मात्र २८ जुलै २०२२ पर्यंत स्मारकाच्या दुरवस्थेबाबतची स्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. स्मारकाचे संरक्षण आणि संवर्धन यांसाठी अनुमाने ४ कोटींचा निधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिल्याचे कळते; मात्र अजूनही त्याबाबत काय सुरू आहे याविषयी माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे उलटूनही देशासाठी आपल्या सर्वस्वाच्या त्याग करणार्‍या लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रपुरुषाचे दुरवस्था झालेले स्मारक पहावे लागत आहे, यापेक्षा दुर्दैव ते काय ?

या निवेदनात स्मारकाच्या जतन आणि संवर्धनासाठी काही मागण्या करण्यात आल्या आहेत. जन्मस्थानाच्या देखरेखसाठी पुरेसा कर्मचारीवर्ग ठेवण्यात यावा, देशभरातून टिळकप्रेमी स्मारकाला भेट देण्यासाठी येत असल्याने माहिती देणारे फलक मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतीलही असावेत, जन्मस्थानाची वास्तू जुनी असल्याने त्याची योग्यप्रकारे दुरुस्ती व्हावी, लोकमान्य टिळकांचे कार्य दर्शवणारा जीवनपट (डॉक्युमेंटरी) चलचित्रपट दाखवण्याची व्यवस्था करण्यात यावी. माहिती पुस्तिका, लोकमान्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या निवडक प्रती, छायाचित्र इत्यादी साहित्य ठेवण्यात यावे. जन्मस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक वर्षे पडून असलेल्या जुन्या वास्तूत लोकमान्य टिळकांविषयीच्या ग्रंथांचे ग्रंथालय उभारण्यात यावे आदी मागण्या निवेदना केल्या आहेत.

*स्मारकाच्या दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तांत्रिक मंजूरीच्या प्रतिक्षेत*
यासंदर्भात पुरातत्व विभाग, रत्नागिरीचे कनिष्ठ अभियंता श्री. शांताराम केकडे म्हणाले की, स्मारकासाठीच्या ४ कोटींच्या निधीला तत्त्वतः प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मारकाच्या दुरुस्तीचे डिटेल एस्टीमेट (तपशीलवार अंदाजपत्रक) आणि स्मारकाच्या परिसराचा विकास करण्यासंदर्भातील ब्लॉक एस्टीमेट (ढोबळ अंदाजपत्रक) पुरातत्व विभाग, रत्नागिरीकडे मान्यतेसाठी पाठवले आहे. ते रत्नागिरी विभागाने राज्य पुरातत्व विभागाकडे पाठवले आहे. त्याला तांत्रिक मंजूरी मिळायची आहे. त्यानंतर ते वित्तीय मंजुरीसाठी पाठवले जाईल, अशी माहिती श्री. केकडे यांनी दिली.

Previous articleतळवली ग्रामपंचायतचा अनिष्ट विधवा प्रथा बंदचा ग्रामसभेत एकमुखी ठराव
Next articleशिंदे सरकार मंत्रीमंडळ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here