Home उतर महाराष्ट्र भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच स्वराज्य संघटनेच्या सुरेश पवारांचा दावा..

भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच स्वराज्य संघटनेच्या सुरेश पवारांचा दावा..

30
0

आशाताई बच्छाव

IMG-20230126-WA0089.jpg

भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच स्वराज्य संघटनेच्या सुरेश पवारांचा दावा..

मनोहर देवरे (प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची घोषणा झाल्यापासून इथे अनेक नाट्यमय घडमोडी आणि अनेक ट्विस्ट पाहायला मिळत असून अजूनही हे सुरूच आहे. आता स्वराज्य संघटना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच मिळेल असा खळबळजनक दावा स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी केला आहे. त्यामुळे पदवीधरमध्ये पुन्हा एक नवा ट्विस्ट आला आहे. बहुचर्चित अशी नाशिक पदवीधरचा रंग आता आणखी वाढणार असून भाजपा सुरेश पवार यांना पाठिंबा देणार का? आणि दिला तर नक्कीच ही निवडणूक तिरंगी होणार असून सामना आणखी रंगतदार होणार आहे.
नाशिक पदवीधरमध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले असून या निवडणुकीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर या निवडणुकीचे चित्र दिवसेंदिवस बदलत चालले असून तांबे सोबतच पाठिंबा मिळवण्यात शुभांगी पाटील ह्या देखील आघाडी मिळवत आहेत. त्यातच तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चा असतनाच आता स्वराज्य संघटनेच्या उमेदवाराने केलेल्या दाव्यामुळे राजकारण बदलाचे चिन्ह आहेत.
भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच मिळनार असल्याचे स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी दावा केला आहे. तसेच संभाजी महाराज यांच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटासोबत बोलणी सुरू असून उद्यापर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघात तुम्हाला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळेल स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते कारण गायकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे नाशकात उद्या काय चित्र असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचे राधाकृष्णन विखे-पाटील यांनी कालच स्पष्ट केले होते की, कोणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल अद्याप पक्ष विचार करत असून लवकरच पाठिंबा जाहीर करणार आहोत. मात्र आता स्वराज्य संघटनेच्या या दाव्यामुळे भाजप त्यांना पाठिंबा देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Previous articleभाजप नेते अद्वय हिरे आज २७ जानेवारीला बांधणार शिवबंधन
Next articleदेवळा तहसिल समोर फुलेवामाळवाडीच्या नागरिकांचे उपोषण आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here